चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल २०२१ मधील प्रदर्शन मागच्या वर्षीच्या तुलनेत सुधारलेले दिसते आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघ सध्या आयपीएलच्या गुणतालीकेत दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी १० सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत.
चेन्नईचा कर्णधार धोनीने फंलंदाजीमध्ये भलेही विशेष प्रदर्शन केले नसले तरीही त्याच्या रणनीतीच्या जोरावर संघाने ही कामगिरी केलेली आहे. याबरोबरच केवळ मैदानावरील कामगिरीनेच नव्हे तर मैदानाबाहेरील कृतीनेही पुन्हा एकदा चाहत्यांची हृदये जिंकली आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केल्यानंतर चेन्नईच्या या कर्णधाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडलेल्या सामन्यमध्ये चेन्नईने बाजी मारली आहे. सामन्यातील विजयानंतर सर्व खेळाडू मैदानाबाहेर जात असताना चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य धोनीसमोर येतो आणि त्याला सलाम ठोकतो. त्याने केलेला सलाम पाहून धोनीही एकमेकांतील अंतर विसरुन जात, त्या स्टाफमधील सदस्याला पुन्हा भारतीय सेनेच्या पद्धतीने सलाम करतो. त्याचा हाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
धोनीच्या चाहत्यांना या गोष्टीची चांगली कल्पना आहे की, तो भारतीय सेनेचा किती आदर करतो. त्याने अनेकदा भारतीय सेनेप्रती त्याच्या मनातील आदर आणि प्रेम जाहीर केले आहे. याच कारणास्तव धोनीला नुकतेच काही दिवसांपूर्वी भारतीय रक्षा मंत्रालयाकडून एनसीसीच्या १५ सदस्यांच्या कमेटीमध्ये सामील केले गेले आहे.
अजून एक सामना जिंकताच चेन्नई जाणार प्लेऑफमध्ये
आयपीएल २०२० चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी फारच खराब राहिला होता. मात्र, त्या प्रदर्शनावर पडदा टाकत चेन्नईने आयपीएलच्या चालू हंगामात दमदार प्रदर्शन केले आहे. चेन्नईने आतापर्यंत सात विजय मिळवले असून अजून एक विजय मिळवला तर संघाची प्लेऑफमधील जागा पक्की होणार आहे. यावर्षी चेन्नईने त्यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये सुधार केलेला दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
षटकार सोडा, साधा चौकारही नाही; राजस्थानची पावरप्लेमध्ये इतिहासातील दुसरी सर्वात ‘वाईट’ कामगिरी