---Advertisement---

घासून नाही ठासून येणार! आयपीएल २०२०मधील नामुष्कीनंतर धोनीच्या ‘त्या’ संदेशामुळे सीएसकेचे ढासू कमबॅक

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 8:34 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज पहिला संघ बनला आहे, ज्यांनी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. पण आयपीएल २०२० चा विचार केला तर चेन्नई सुपर किंग्जची अवस्था फारच बिकट झाली होती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफपर्यंत पोहोचला नव्हता. त्यानंतर चेन्नईवर बऱ्याच टीकाही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर आता आयपीएलच्या चालू हंगामात संघाने जबरदस्त प्रदर्शन केले आहे आणि टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संघाने केलेल्या या पुनरागमनाचे कारण सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे.

कर्णधार एमएस धोनीने दिलेल्या खास संदेशामुळे संघाला स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी चांगला फायदा झाल्याचे सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले आहे. ते इनसाईड स्पोर्ट्सशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, “एमएसचा खास संदेश खूपच स्पष्ट होता, चिंता करू नका. हा फक्त एक हंगाम होता आणि हे खेळात होत राहतं.”

विश्वनाथन यांच्या मते कर्णधाराने दिलेल्या या विश्वासामुळे संघामधील खेळाडूंनी चिंता केली नाही आणि सर्वांना कर्णधारावर विश्वास होता. विश्वनाथन यांनी पुढे सांगितले की, “आम्ही अजिबात चिंतेत नव्हतो. आम्हाला कर्णधार आणि संघावर पूर्ण विश्वास होता की, ते काही काळात पुनरागमन करतील आणि तुम्ही पाहू शकता, आम्ही तेच केले आहे.”

तो पुढे म्हणाले, “एका क्षणासाठीही आम्ही संघाच्या अपयशाविषयी चिंतित नव्हतो. आम्हाला विश्वास होता की गोष्टी चांगल्या होतील, भले आम्हाला एकदा पुन्हा यूएईत जावे लागेल. पहिल्या सामन्यात पराभव प्रक्रियेचा भाग होता आणि त्याच्यामुळे कोणीच त्यांचा आत्मविश्वास गमावला नाही.”

दरम्यान, आयपीएल २०२० च्या खराब प्रदर्शनानंतर सीएसके संघात बदल करेल असा सर्वाचा अंदाज होता. परंतु संघाने तसे केले नाही आणि सर्वांनाच हैराण केले. संघाने कर्णधार धोनी व्यतिरिक्त ड्वेन ब्रावो, सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, इमरान ताहिर, अंबाती रायडू यांच्यासरख्या खेळाडूंना संघात कायम ठेवले, ज्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त आहे. सीएसकेने आयपीएलच्या चालू हंगामात याच खेळाडूंच्या जोरावर खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि गुणतालिकेत १८ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्लेऑफमध्ये स्थान तर मिळवले, आता काय असेल चेन्नईची पुढील योजना, मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंगकडून स्पष्टीकरण

बापरे…किती? १३व्या हंगामाच्या तुलनेत १४व्या हंगामात टीव्ही दर्शकांमध्ये कमालीची वाढ, आकडा वाचून होतील बत्त्या गुल

पंजाबच्या विजयाने दिल्लीसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडले, पाहा पाँइंटटेबलमध्ये कोणता संघ कुठल्या स्थानी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---