‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा हंगाम अवघ्या २ आठवड्यांवर आला आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्याने या हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी या लीगचे नवे अँथम साँग लॉन्च झाले आहे. मंगळवारी (२३ मार्च) आयपीएलचा अधिकृत प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सने हे गाणे प्रसारित केले आहे. या गाण्याने अगदी कमी काळात आयपीएल प्रेमींच्या मनात घर केले आहे.
यंदा ‘यह अपना मंत्रा है, इंडिया का अपना मंत्रा’, हे या गाण्याचे थीम आहे. जवळपास दीड मिनिट चालणाऱ्या या व्हिडिओत भारतीय क्रिकेटची वेगाने होणारी प्रगती दाखवण्यात आली आहे. याबरोबरच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघनायक विराट कोहली हे देखील या गीतावर ठुमके लगावताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर चेन्नई सुपर किंग्जचे नवोदित फलंदाज थिरकताना दिसत आहेत.
#VIVOIPL 2021 Anthem salutes the new, bold and confident spirit of India. Let’s all believe in #IndiaKaApnaMantra.
Tell us what you think will be your team's Success Mantra this season.
VIVO IPL 2021 – Starts from April 9! pic.twitter.com/d8STLot31X
— Star Sports (@StarSportsIndia) March 23, 2021
एवढेच नव्हे तर, केएल राहुल, वृद्धिमान साहा, शुबमन गिल असे प्रत्येक फ्रँचायझीचे प्रत्येकी एक खेळाडू या गीतावर नाचताना दिसत आहेत. या गीताने आयपीएल २०२१ च्या धमाकेदार हंगामाची झलक दाखवली आहे. आयपीएल प्रेमींकडून या गीतावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.






