आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात हंगामातील ३५ सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्स राखत विजय मिळवला. हा सामना सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झाला असून मैदान लहान असल्यामुळे गोलंदाजांची चांगलीच धुलाई चालू होती. सामन्यात चेन्नईच्या रवींद्र जडेजाने चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. जडेजाने त्याच्या ४ षटकांमध्ये केवळ ३१ धावा दिल्या आणि आरसीबीला जास्त धावा करण्यापासून रोखले.
दरम्यान गोलंदाजी करताना जडेजाने असे काही कृत्य केले आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आरसीबीच्या फलंदाजीवेळी रवींद्र जडेजा ११ व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला हाता. तो यावेळी चांगल्या लयीत दिसला. षटकातील एक चेंडू त्याने जवळपास १०० मीटरच्या वेगाने फलंदाजी करणाऱ्या देवदत्त पडिक्कलपासून थोड्या लांब अंतरावर फेकला. पडिक्कल त्याने फेकलेल्या या चेंडूवर नाराज दिसला आणि त्याने अंपायरकडे वाइड बाॅलची मागणी केली. मात्र अंपायरने त्याला दाद दिली नाही आणि वाइड बाॅल दिला नाही.
अंपायर अनिल चौधरींवर पडिक्कलच्या मागणीनंतर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. अंपायरने दिलेल्या निर्णयामुळे जडेजा मात्र खुश दिसला आणि त्याने चक्क अंपायरच्या पाठीवर थाप दिली. जडेजाने अंपायरला दिलेल्या शाबासकीनंतर अनिल चौधरींची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. काहींना जडेजाची ही स्टाईल चांगलीच आवडली आहे. तर काहींना त्याचे हे लागणे पटलेले नाही. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/pant_fc/status/1441431435110354945?s=20
दरम्यान, सामन्यामध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी केली होती. सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघासाठी १११ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात दिली. पण त्यानंतर संघाला मोठी धावसंख्या साकारता आली नाही आणि २० षटकात केवळ संघाने केवळ १५६ धावांचे आव्हान दिले. चेन्नईच्या ड्वेन ब्रावो ३, शार्दुल ठाकुर २ आणि दीपक चाहरने १ विकेट्स घेतल्या. सीएसकेने हा सामना १८.१ षटकात आणि सहा विकेट्स राखून जिंकला
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त क्रिकेटर नव्हे तर धोनी माणूस म्हणूनही खूप मोठा, सर्वांपुढे स्टाफ मेंबरला ठोकला ‘सॅल्यूट’
बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२ व्या वर्षीही ख्रिस गेलने रचला इतिहास, मोडला द्रविडचा अनोखा विक्रम