आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. उर्वरित सामन्यांसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघे एकत्र यूएईमध्ये पोहोचले आहेत. भारतीय खेळाडू इंग्लंविरुद्धचा पाचवा सामना खेळल्यानंतर आयपीएलसाठी रवाना होणार होते. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्रींसह चार सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर सामन्याच्या दोन तास आधी बीसीसीआयने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळेच खेळाडू लवकर यूएईमध्ये दाखल झाले आहेत.
अशात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने त्यांच्या ट्विटर खात्यावरून कोहली आणि सिराज यूएईमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
इंग्लंविरुद्धचा पाचवा सामना संपल्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना इंग्लंमधून यूएईमध्ये आणण्यासाटी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली होती. मात्र, पाचवा सामना रद्द झाल्यानंतर नियोजित कार्यक्रम बदलला आणि आयपीएल फ्रेंचाजझींना त्यांच्या खेळाडूंना यूएईमध्ये आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागली. यानंतर आरसीबी संघाकडून सांगितले गेले होते की, खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे. म्हणून त्यांनी कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद सिराजला इंग्लंडमधून आणण्यासाठी स्वतंत्र्य चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली आहे.
राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून या दोघांचा फोटो शेअर करत दोघे यूएईमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसत आहे की, विराट कोहलीने ट्राउजर आणि पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे. तसेच मोहम्मद सिराजने पिवळ्या रंगाचा हुडी आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे.
The news you’ve all been waiting for: King Kohli and Miyan Magic have joined the team in Dubai. 🤩
Bring on #IPL2021. 💪🏻#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/ZNH1CxhAg3
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 12, 2021
दोघांनाही युएईत दाखल झाल्यानंतर ६ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. दोघेही खेळाडू सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर आणि कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर संघासोबत सहभागी होणार आहेत. यापूर्वी इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामना खेळल्यानंतर खेळाडूंना यूएईत पोहोचल्यावर विलगीकरणात ठेवले जाणार नव्हते. मात्र, कसोटी मालिकेदरम्यान भारताच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यामुळे नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व
तुम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही; ‘त्या’ प्रकरणावरुन भारतीय दिग्गजाचा विराट-शास्त्री यांना पाठिंबा
नेपाळच्या गोलंदाजापुढे विरोधी संघाची फलंदाजी फळी खिळखिळी, ५.१ षटकात काढल्या ६ विकेट्स