मुंबई। इंग्लंड विरुद्धच्या मायदेशातील मालिका आता संपल्याने सर्वांना इंडियम प्रीमीयर लीगचे वेध लागले आहेत. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामासाठी आता प्रत्येक संघात त्यांचे खेळाडू दाखल होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका संपल्याने या दोन्ही संघातील आयपीएलमध्ये समावेश असलेले खेळाडू शनिवारी(२९ मार्च) आपल्या आयपीएल संघांशी जोडले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे.
रोहित झाला मुंबई इंडियन्समध्ये दाखल
खरंतर आयपीएलसाठी संघांच्या बायोबबलमध्ये दाखल होण्यापूर्वी नियमाप्रमाणे खेळाडूंना ७ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मात्र, जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून थेट आयपीएल संघात दाखल होणार आहेत, त्यांना यातून सुटका दिली आहे. कारण ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने आधीच बायोबबलमध्ये आहेत, त्यामुळे ते थेट संघात सामील होऊ शकतात.
त्याचमुळे नुकतेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत खेळलेले खेळाडू, जे आयपीएलचा भाग आहेत, ते थेट आपल्या आयपीएल संघात सामील झाले आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मादेखील शनिवारी मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. तो संघात दाखल होण्यासाठी बीएमडब्ल्यू कारमधून येत असतानाचा व्हिडिओ देखील मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओमध्ये ‘आला रे’ हे मुंबई इंडियन्सचे गाणेही वाजत आहे.
🙁 Where is RO ➡️ Here we GO! 😎#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @ImRo45 https://t.co/epbgkGM3at pic.twitter.com/GCVeKrKr3P
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2021
Hitman is in the house 💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @ImRo45 pic.twitter.com/5A3uKP0hkw
— Mumbai Indians (@mipaltan) March 29, 2021
रोहितपूर्वी हार्दिक आणि कृणाल पंड्या, सुर्यकुमार यादव हे देखील मुंबई इंडियन्स संघात दाखल झाले आहेत.
मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ
मुंबई इंडियन्सने मागीलवर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा कारनामा केला होता. हा कारनामा करणारा मुंबई इंडियन्स एकमेव संघ आहे. त्यांच्या खालोखाल चेन्नई सुपर किंग्सने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
मुंबईच्या मोहिमेला चेन्नईपासून सुरुवात
आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे मुंबई इंडियन्यची आयपीएल २०२१ची मोहिम यंदा चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममधून सुरु होईल. मुंबईला पहिले ५ सामने चेन्नईमध्ये खेळायचे आहे. मुंबईचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९ एप्रिलला होईल.
असा आहे मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२१ साठी संघ –
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर
असे आहेत आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील सामने –
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल- चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल- चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी ३.३० वाजता
१ मे – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१६ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा बनविणारे संघ, भारत ‘या’ स्थानावर
असं नक्की घडलं काय की विराट आणि वूडमध्ये पेटला वाद, चाहत्यांनाही पडला प्रश्न