पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२८ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे वनडे मालिकेतील तिसरा सानमा पार पडला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळत ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. इंग्लंडकडून शेवटच्या षटकापर्यंत सॅम करन आणि मार्क वूडने झुंज दिली होती. मात्र, त्यांना इंग्लंडला विजय मिळवून देण्यात अपयश आहे. दरम्यान, हे दोघे फलंदाजी करताना वूडची आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसले.
वूडवर चिडला विराट
झाले असे की ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आदिल राशिदच्या रुपात इंग्लंडची ८ वी विकेट गेली. त्यामुळे आता भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र १० व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्क वूडने सॅम करनची भक्कम साथ द्यायला सुरुवात केली. या दोघांनीही इंग्लंडला ३०० च्या पार नेताना विजयाच्या आशाही पल्लवित केल्या होत्या.
या दोघांची भागीदारी रंगत असतानाच ४८ व्या षटकात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीसाठी आला. या षटकातील ५ व्या चेंडूवर वूडने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या पॅडला लागला. ज्यावेळी चेंडू त्याच्या पॅडला लागला होता, त्यावेळी त्याची बॅटही चेंडूच्या जवळ होती. यावर भारतीय संघाने वूड बाद झाल्याचे अपील केले. त्यावर पंचांनीही तो बाद असल्याचा निर्णय दिला. मात्र, वूडने डीआरएसचा वापर केला. त्यात तो नाबाद असल्याचे दिसले.
यादरम्यान वूडने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नियमाप्रमाणे जेव्हा मैदानावरील पंच बादच्या निर्णय देतात, तेव्हा कोणतीही धाव ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे वूड पुन्हा स्ट्राईकवर गेला, तर सॅम करनला नॉन-स्ट्रायकर एन्डला जावे लागले. त्याचवेळी स्ट्राईकवर जात असलेल्या वूडजवळ विराट आला आणि त्यानंतर विराट व वूडमध्ये काहीतरी वाद सुरु झाले. त्यावेळी पंचांनी मध्ये येऊन त्यांना वेगळे केले.
असे असले तरी, त्यावेळी त्यांच्यात वाद का झाले, याबद्दलचे कारण समोर आले नाही. त्यामुळे चाहत्यांनीही याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
What was Virat issue with Wood?
— Rhys Jenkins (@realRLJ) March 28, 2021
https://twitter.com/gdberry12/status/1376210238957891584
Virat behaving stupidly with wood @cricket_badger
— Jogendra singh shekhawat (@Glassofmonk) March 28, 2021
भारताने जिंकला सामना –
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिले. भारताने याचा फायदा घेत ४८.२ षटकात सर्वबाद ३२९ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून शिखर धवन(६७), रिषभ पंत(७८) आणि हार्दिक पंड्याने(६४) अर्धशतके केली. तसेच इंग्लंडसाठी सर्वाधिक ३ विकेट्स वेगवान गोलंदाज मार्क वूडने टिपले.
त्यानंतर प्रतिउत्तरादाखल इंग्लंडला ५० षटकात ९ बाद ३२२ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करनने नाबाद ९५ धावांची झुंजार खेळी केली. तर डेव्हिड मलानने ५० धावांची खेळी केली. याबरोबरच ९ व्या विकेटसाठी वूड आणि करन यांच्यात ६० धावांची भागीदारी झाली होती. मात्र अन्य कोणत्याही खेळाडूला खास काही करता आले नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार का? इयान चॅपेल यांनी दिले उत्तर
भारीच की! एकाच षटकात ६ षटकार मारणारा थिसरा परेरा नववा क्रिकेटपटू; जाणून घ्या कोण आहेत अन्य ८ खेळाडू
सॅम करनच्या खेळीत एमएस धोनीची झलक दिसली, पाहा कुणी केलंय हे विधान






