---Advertisement---

नाद करा पण आमचा कुठं! संदीपने घेतला निकोलसचा जबरदस्त झेल; पाहून तुम्हीही कराल कौतुक

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 2:14 PM
---Advertisement---

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (२५ सप्टेंबर) पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने पाच धावांनी विजय मिळवला. असे असले तरी हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकली होती आणि पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हैदराबादच्या गोलंदाजांनीही कर्णधाराने घेतलेल्या निर्णयाला साजेशी कामगिरी केली आणि पंजाब किंग्जला अवघ्या १२५ धावांवर रोखले होते.

सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यामध्ये जेसन होल्डर ३ विकेट्स, भुवनेश्वर कुमार १, संदीप शर्मा १, राशिद  खान १ आणि अब्दुल शामदच्या १ विकेट्सचा समावेश आहे. संघाचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने सामन्यात फायदेशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांमध्ये २० धावा दिल्या आणि एक अप्रतिम विकेटही घेतली. त्याने पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनचा जबरदस्त झेल घेतला आणि त्याला तंबूत पाठवले. निकोलस पूरनने त्यावेळी चार चेंडूंमध्ये आठ धावा केल्या होत्या.

निकोलस पूरनने बाद होण्याच्या आधीच्या चेंडूवरच एक मोठा षटकार मारला होता. संदीप शर्माच्या पुढच्या चेंडूवर देखील त्याने मोठा शाॅट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा शाॅट त्याने गोलंदाजी करणाऱ्या संदीपच्या दिशेने मारला आणि संदीपने एकही चूक न करता तो चेंडू झेलला. सुरुवातीला असे वाटले की, हा झेल तो घेऊ शकणार नाही आणि चेंडू सोडून देईल, पण संदीपने पूरनने मारलेला चेंडू हाताने अडवला आणि झेल घेतला. संदीपने घेतलेल्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/CowCorner9/status/1441785052698853388?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1441785052698853388%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fsandeep-sharma-took-superb-catch-to-dismiss-nicholas-pooran-video-srh-vs-pbks-84379

दरम्यान, सामन्यात पहिल्यांदा पंजाब किंग्जने फलंदाजी केली आणि अवघ्या १२५ धावांचे आव्हान हैदराबादसमोर ठेवले होते, पण हैदराबादला ते आव्हान गाठता आले नाही. पंजाबच्या गोलंदाजांनी सामन्यात चांगले प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. तसेच हैदराबादच्या जेसन होल्डरला सामनावीर म्हणून निवडले गेले. त्याने त्याच्या चार षटकांमध्ये १९ धावा देत ३ विकेट्स मिळवल्या आणि २९ चेंडूत ४७ धावांची नाबाद खेळीही केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-ज्याने पंजाबच्या तोंडून हिसकावला असता सामना, त्याच खेळाडूचे कर्णधार राहुलने गायले खूप गुणगान

-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---