---Advertisement---

कार्तिकने जाणून बुजून सोडला राहुलचा झेल? नेटकऱ्यांच्या गंभीर प्रतिक्रिया; बघा नेमकं काय घडलं

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 12:48 PM
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी (१ सप्टेंबर) हंगामातील ४५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने ५ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. सामन्यात केकेआरचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार दिनेश कार्तिकने पंजाबचा कर्णधार केएल राहुलचा एक सहज घेता येईल असा झेल सोडला आहे. केएल राहुल सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत होता आणि अशातच कार्तिकने त्याचा झेल सोडल्यामुळे केकेआरचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर नेटकरी कार्तिकला त्याच्या चुकीसाठी ट्रोल करत आहेत.

सामन्यात केएल राहुलला एका चेंडूचा नीट अंदाज घेता आला नाही. त्याने या चेंडूवर मारलेला शॉट त्याच्या बॅटवर व्यवस्थित बसला नाही. राहुलने मारलेला शॉट यष्टीमागे हवेत उडाला. यष्टीरक्षक कार्तिक हा चेंडू झेलू शकणार नाही असे कुणालाच वाटले नव्हते. पण कार्तिकने ही चूक केली आणि झेल घेऊ शकला नाही. त्याने हा झेल पकडण्यासाठी त्याचे हात पुढे केलेच नाहीत. कार्तिक धावत चेंडूजवळ गेला पण त्याने झेल पकडण्याच्या ठीक आधी त्याचे हात मागे घेतले आणि चेंडू मैदानावर पडला.

https://twitter.com/mhpradhan/status/1444003661244424193?s=20

कार्तिकने झेल सोडलेला पाहून चाहते चांगलेच हैराण झाले आहेत आणि त्याने झेल का सोडला? असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही चाहत्यांच्या मते कार्तिकने जाणून बुजून केएल राहुलचा हा झेल सोडला आहे. यानंतर चाहते कार्तिकवर चांगलेच भडकले आहेत आणि सोशल मीडियावर त्याला ट्रोल करू लागले आहेत. काहींनी तर थेट त्याने फिक्सिंग केल्याचा आरोप केला आहे. कार्तिकने झेल सोडलेल्या केएल राहुलने पंजाबच्या विजयममध्ये मोठे योगदान दिले आहे.

https://twitter.com/Mohitti778814/status/1443998243482832896?s=20

https://twitter.com/kundsingh221074/status/1444176097252306947?s=20

केएल राहुलने या सामन्यात पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक ६७ धावा केल्या. राहुलव्यतिरिक्त मयंक अगरवालनेही पंजाबसाठी ४० धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात योगदान दिले. सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये पंजाबच्या शाहरुख खानने ९ चेंडूत २२ धावांची महत्वाची खेळी केली. केकेआरसाठी वेंकटेश अय्यरनेही ६७ धावांची महत्वाची खेळी केली होती.  केकेआरने सामन्यात प्रथम फलंदाजी करत सात विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९.३ षटकात आणि पाच विकेट्स राखून केकेआरने दिलेले लक्ष्य गाठले.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकचं आठवला; दशकानंतर कॅप्टनकूल धोनीचा ‘जादुई’ षटकार, जुन्या आठवणी झाल्या ताज्या

शाहरुखचा मॅच विनिंग षटकार अन् पंजाबच्या ताफ्यात आनंदाची लहर, संघमालकीनीच्या आनंदाला तर सीमा नव्हती

मुंबई वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम 11’ टीम, यांच्यावर पैसा लावल्यास मालामाल होण्याची संधी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---