चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ६ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात बुधवारी(१४ एप्रिल) झाला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोर संघाने ६ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा सलग दुसरा विजय आहे. तर हैदराबादचा सलग दुसरा पराभव आहे.
बेंगलोर संघाच्या १५० धावांचे आव्हान करताना हैदरबाद संघाला सुरुवातीलाच एक धक्का बसला. सिराजच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहा स्वस्तात बाद झाला. यानंतर मात्र डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांनी किल्ला लढवत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. डेव्हिड वॉर्नरने त्याचे अर्धशतक साकारले मात्र, १३ व्या षटकात जेमिसनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या.
वॉर्नर बाद झाल्यानंतर मात्र, हैदरबादच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावण्यास सुरुवात केली. वॉर्नरनंतर १७ व्या षटकांत जॉनी बेअरस्टो(१२), मनिष पांडे(३८) आणि अब्दुल समद(०) हे तिघेही शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर १८ व्या षटकात विजय शंकर(३), तर १९ व्या षटकात जेसन होल्डर(४) बाद झाल्याने बेंगलोरच्या विजयाच्या आशा जाग्या झाल्या.
त्यानंतर अखेरच्या षटकांत राशिद खान (१७) आणि शाहबाज नदीमही(०) बाद झाल्याने अखेर बेंगलोरने ६ धावांनी विजय मिळवला.
बेंगलोरकडून शाहबाजने २ षटके गोलंदाजी करताना ७ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर काईल जेमीसनने १ विकेट घेतली.
A brilliant 50-run stand comes up between @davidwarner31 & @im_manishpandey
Live – https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/aFjuYCQGeb
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने २० ओव्हरमध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार खेळी करत ५९ धावा केल्या. मात्र संघातील इतर सहकाऱ्यांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. मॅक्सवेलनंतर कर्णधार विराटने सर्वाधिक ३३ धावा केल्या.
हैदराबाद संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ बळी घेत बंगळुरु संघाचे अगदी कंबरडे मोडले. त्याला रशीद खान, भुवनेश्वर आणि टी नटराजन यांनी सुरेख साथ दिली.
FIFTY!
The much awaited half-century for @Gmaxi_32 ????????. This one comes after the 2016 edition of #VIVOIPL.
Live – https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/BByV7taJmi
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
बुधवारच्या सामन्यासाठी बेंगलोरच्या अंतिम ११ जणांच्या संघात देवदत्त पडीक्कलचे पुनरागमन झाले. त्यामुळे रजत पाटीदारला संघातून बाहेर पडावे लागले. तसेच हैदराबाद संघात २ बदल झाले. मोहम्मद नबी आणि संदीप शर्मा यांना अंतिम ११ जणांमधून वगळण्यात आले, तसेच जेसन होल्डर आणि शाहबाज नदीम यांना संघात संधी मिळाली.
असे आहेत ११ जणांचे संघ –
सनरायझर्स हैदराबाद – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, शाहबाज नदीम
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल ख्रिस्टिन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल