आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत सर्वात खराब प्रदर्शन सनराझर्स हैदराबाद संघाचे राहिले आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील चौथ्या आणि हंगामाच्या ३३ व्या सामन्यासाठी सनराजझर्स हैदराबात आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. दिल्लीने २ विकेट्स गमावत हैदराबाद संघाने दिलेले १३५ धावांचे आव्हान सहज गाठले आणि सामन्यात विजय मिळवला. हैदराबाद संघाचे आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील प्रदर्शनही खूप खराब राहिले होते. दरम्यान, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या जर्सीमधील एक महिला खूपच निराश दिसत होती. सध्या तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
मैदानात हैदराबादच्या जर्सीत दिललेली महिला यापूर्वीही हैदराबादला प्रोस्ताहन देण्यासाठी अनेकदा मैदानात दिसली आहे. अशात अनेकांकडून प्रश्न विचारला जात आहे की, ही महिला आहे तरी कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे की, ही महिली सनराजझर्स हैदराबाद संघाचे मालक अलानिधि मारन यांची मुलगी आणि संघाची सीईओ काव्या मारन आहे. सनरायझर्स संघाचे स्वामित्व सन टीमकडे आहे, ज्याचा कारभार दयानिधि मारन यांचा परिवार पाहतो.
त्यामुळे हैदराबाद संघाची सीईओ असलेली काव्या त्यांच्या प्रत्येक सामन्यास हजेरी लावते. त्यामुळे हैदराबादच्या प्रत्येक सामन्यानंतर तिची चर्चा होत असते. यंदाचा सामना झाल्यानंतरही चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बऱ्याचशा सामना दर्शकांनी काव्याचे लाईव्ह सामन्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर, सनरायझर्स हैदराबाद संघाला पाठिंबा देण्यामागचे एकमेव कारण काव्या असल्याची लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
The Pain of Hotstar subscription charges is gone after his beautiful smile ????????????#DCvSRH #KavyaMaran #SRHvsDC #SRH #DC #IPL2021 #ViratKohli #ShikharDhawan #RishabhPant #BCCI #IPL #IndianCricketTeam #India #CSK #Dookudu #Natarajan #OrangeArmy #OrangeOrNothing pic.twitter.com/wTG0qoIsgR
— Cricket Records (@records_king_18) September 22, 2021
https://twitter.com/_prince_Rajput/status/1440703250479521793?s=20
https://twitter.com/KabeerMoni/status/1440694988631785474?s=20
https://twitter.com/alok_aarav14/status/1440624328068853788?s=20
दरम्यान, हैदराबाद संघ दिल्लीविरुद्धच्या सामन्यात माफक धावा बनवू शकला नाही. त्यांनी दिल्लीसमोर अवघ्या १३४ धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याला दिल्ली संघाने सहज गाठले. दिल्लीने सामन्यात ८ विकेट्स राखत विजय मिळवला आहे. तसेच २० षटकांपैकी १३ चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकला आहे.
हैदराबाद संघाचे आयपीएल २०२१ च्या हंगामात आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता ते खूपच खराब राहिले आहे. संघाने खेळलेल्या पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकला होता आणि आता नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही हैदराबाद संघ पराभूत झाला आहे. अशात हैदराबाद आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांपैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवू शकला आहे. गुणतालिकेत संघ केवळ २ गुणांसह सर्वात तळाशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका, ‘हा’ धाकड अष्टपैलू जायबंदी; आयपीएलदरम्यान झाली दुखापत
Video: पंत जिथे मनोरंजन तिथे! हवेत उडालेली रिषभची बॅट परत करताना विलियम्सनलाही आवरेना हसू