मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धेत आता ३० सामने पूर्ण झाले आहेत. या स्पर्धेदरम्यान रोज क्रिकेटच्या मैदानात विविध घटना घडताना दिसत आहेत, ज्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. अशी एक घटना सोमवारी (१८ एप्रिल) ३० व्या सामन्यात घडली. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यादरम्यान कोलकाताचा सलामीवीर ऍरॉन फिंच बाद झाल्यानंतर राजस्थानचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाशी वाद घालताना दिसला.
झाले असे की या सामन्यात राजस्थानने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून सलामीवीर ऍरॉन फिंचने तुफान फटकेबाजी केली आणि अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरत कर्णधार श्रेयस अय्यरबरोबर शतकी भागीदारीही केली. पण अर्धशतक केल्यानंतर ९ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर फसवले. त्यावर थर्ड मॅनच्या दिशेला फिंचचा झेल करुण नायरने पकडला. त्यामुळे फिंचला २८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा करून माघारी परतावे लागले.
पण बाद झाल्यानंतर फिंच आणि गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यात काहीतरी वादावादी झाल्याचे दिसून आले. फिंच प्रसिद्ध कृष्णाला काहीतरी बोलताना दिसला, त्यावर गोलंदाजानेही त्याला प्रत्युत्तर दिले. या दोघांमधील वादावादीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (IPL 2022: Aaron Finch and Prasidh Krishna get involved in verbal spat)
https://twitter.com/Raj93465898/status/1516102784575188996
https://twitter.com/keshxv1999/status/1516259561766023172
दरम्यान, सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने शतकी खेळी करताना ६१ चेंडूत १०३ धावा केल्या. तसेच कर्णधार संजू सॅमसनने ३८, देवदत्त पडीक्कलने २४ आणि शिमरॉन हेटमायकने २६ धावांचे योगदान दिले. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१७ धावा केल्या. कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २१८ धावांचा पाठलाग करताना कोलकाताकडून फिंच आणि श्रेयसने १०७ धावांची शतकी खेळी केली. यादरम्यान दोघांचेही अर्धशतक झाले. श्रेयसने ८५ धावांची खेळी केली. मात्र, दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाला फार काही खास करता आले नाही. त्यामुळे कोलकाताचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद २१० धावांवर संपुष्टात आला. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने ५ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
देवदत्त पडीक्कलचा कोलकाताविरुद्ध केवळ २४ धावा करूनही मोठा पराक्रम; विराट-रोहितला पछाडलं
श्रेयस अय्यरचे केकेआरचा प्रशिक्षक मॅक्युलमशीच झाले भांडण? Video व्हायरल
चहल आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा १८ वा खेळाडू; याआधी ‘या’ १७ गोलंदाजांनी केलाय असा कारनामा