जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम २६ मार्चपासून खेळला जाणार. कोरोनापासून खबरदारी म्हणून या वर्षी स्पर्धेचे सर्व सामने मुंबई व पुणे येथील चार वेगवेगळ्या मैदानांवर होतील. आयपीएल २०२२ साठीच्या जाहिरातीचे अनावरण शुक्रवारी (४ मार्च) करण्यात आले. भारतीय संघाचा माजी कर्णधार व आयपीएलमध्ये विद्यमान विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी या जाहिरातीमध्ये आपल्या खास अवतारात झळकला आहे.
धोनी बनला बस ड्रायव्हर
आयपीएलचे थेट प्रसारण करणाऱ्या वाहिनीने आगामी आयपीएलसाठी जाहिरात लॉन्च केली. सलग तिसऱ्या वर्षी धोनी या जाहिरातीत दिसतोय. आयपीएलच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये धोनी बस ड्रायव्हर दिसत आहे. तो भर रस्त्यात बस थांबवून प्रवाशांना सामना दाखवताना दिसतोय. धोनीचा हा अवतार प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांच्याप्रमाणे भासत आहे. या जाहिरातीतील एक पात्र धोनीला थाला म्हणतानाही दिसून येते. यावर्षी आयपीएलसाठी #YehAbNormalHai हा अधिकृत हॅशटॅग वापरला जाणार आहे. या वर्षी प्रथमच प्रसिद्ध भारतीय उद्योग समूह टाटा स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असणार आहेत.
When it's the #TATAIPL, fans can go to any extent to catch the action – kyunki #YehAbNormalHai!
What are you expecting from the new season?@StarSportsIndia | @disneyplus pic.twitter.com/WPMZrbQ9sd
— IndianPremierLeague (@IPL) March 4, 2022
मुंबईत होणार संपूर्ण स्पर्धा
कोरोनामूळे यावर्षी स्पर्धा मुंबई येथील वानखेडे स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम व ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळली जाईल. तसेच, पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमच्या स्टेडियमवर देखील सामने खेळवले जाणार आहेत. २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पहिला सामना होऊ शकतो. यावर्षी गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धा दोन गटात खेळली जाईल. स्पर्धेचे प्ले ऑफ सामने अहमदाबाद येथे होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-