---Advertisement---

अनुष्काच्या सुंदर फोटोला पाहून विराट पुन्हा एकदा पडला प्रेमात! कमेंट करत म्हणाला, ‘उफ टू हाॅट’

On: शनिवार, एप्रिल 2, 2022 11:15 PM
---Advertisement---

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे देशातील टॉप आणि नेहमीच ट्रेंडमध्ये राहणाऱ्या कपल्सपैकी एक आहेत. सध्या विराट कोहली आयपीएल २०२२ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघासोबत आहे आणि त्याची पत्नी आणि मुलगी वामिका देखील त्याच्यासोबत बायो बबलमध्ये आहेत. शनिवारी (२ एप्रिल) अनुष्का शर्माने स्वतःचा आणि पती विराट कोहलीचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला, जो पाहून विराट कोहली देखील स्वत:ला रोखू शकला नाही आणि कमेंट करून तीचे कौतुक केले आहे.

अनुष्का शर्मा सध्या आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीच्या बायो बबलमध्ये असून ती अद्याप सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आली नाही. तीने सोशल मीडियावर संघाच्या हॉटेलमधील दोघांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर कमेंट करत विराटने लिहले की, ‘उफ टू हाॅट’. तसेच विराटने देखील अनुष्कासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोला १८ लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/Cb1l5hopwD8/?utm_source=ig_embed&ig_rid=a621a177-393e-4c39-899b-2ef9c0ecd815

https://www.instagram.com/p/CbrRJaWNSPV/?utm_source=ig_embed&ig_rid=fa656c69-809a-4d4c-8771-16d34eb7e057

विराट कोहलीने २०२१ च्या शेवटी आंतरराष्ट्रीय टी२० चे कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आले आणि २०२२ च्या सुरुवातीला त्याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तो सध्या कोणत्याच क्रिकेट फाॅरमॅटमध्ये कर्णधार नाही, तसेच तो आरसीबी संघाचा सुद्धा कर्णधार नाही.

आयपीएलचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच आरसीबीकडून खेळाडू म्हणून खेळत आहे. यंदाच्या हंगामात संघाची कमान फाफ डू प्लेसिसच्या हातात आहे. संघाने आतापर्यंत दोन सामन्यातील एका सामन्यात विजयाची नोंद केली आहे, तर एका सामन्यात संघाला चांगली फलंदाजी करूनही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाला पंजाबने ५ विकेट्सने पराभूत केले तर आरसीबीने कोलकातावर ३ विकेट्सने विजय मिळवला. आरसीबी आपला चौथा सामना ५ एप्रिलला पंजाबविरुद्ध खेळणार आहे. आयपीएल इतिहासात आरसीबीने एकदाही आयपीएल ट्राॅफी जिंकलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या विजयाचा आनंद! चेन्नईला पराभूत केल्यानंतर लखनऊच्या खेळाडूंचे नाच-गाण्यासह जोरदार सेलिब्रेशन

बुमराह सॅमसनला म्हणतोय, ‘कसोटीपण जिंकवली, आता बॅटच्या स्टिकरवर माझं नाव हवं’; Video व्हायरल

रसलच्या तुफानी खेळीचं किंगखानकडून कौतुक! म्हणाला, ‘चेंडू एवढा उंच उडताना…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---