इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगाम सध्या भारतात खेळवण्यात येत आहे. दरम्यान, ही स्पर्धा गेल्या २ वर्षांप्रमाणेच कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली खेळवली जात आहे. दरम्यान, काहीदिवसांपूर्वीच अशी माहिती समोर आली होती की, दिल्ली कॅपिटल्सचे काही सदस्य कोरोनाच्या तावडीत सापडले आहेत. त्यामुळे संघाचे पुण्याला जाणेही रद्द करण्यात आले. आता अशी बातमी समोर येत आहे की, दिल्लीचा पंजाब किंग्सविरुद्ध होणारा सामना पुण्याऐवजी मुंबईतच खेळवला जाणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) संघात निर्धारीत वेळापत्रकानुसार २० एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे (MCA Stadium) येथे होणार होता. पण, हा सामना आता बुधवारीच (२० एप्रिल) होणार आहे, पण पुण्यात न खेळवता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलने दिलेल्या माहिती नुसार याबद्दल मंगळवारी (१९ एप्रिल) झालेल्या आयपीएल बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या सामन्यापूर्वी खेळाडूंची आणि संघातील सदस्यांच्या आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR Test) होतील. त्यानंतर सामना खेळवण्याचा अंतिम निर्णय होईल.
सोमवारी (१८ एप्रिल) समोर आलेल्या वृत्तानुसार दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श याचा कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आलेली असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच दिल्लीचे अन्य काही सदस्यही कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दिल्लीचे (Delhi Capitals) फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट, स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर अभिजीत सालवी आणि सोशल मीडिया सदस्य आकाश माने यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे दिल्लीचे अन्य खेळाडू आणि सदस्य क्वारंटाईन आहेत आणि खेळाडूंना मुंबईतच सराव करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर त्यांची रोज १६ एप्रिलपासून आरटी पीसीआर टेस्ट होत आहे. नुकतील या सर्वांची चौथी आरटी-पीसीआर टेस्ट झाली, ज्यात कोणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. तसेच सामन्यापूर्वीही या सर्वांची टेस्ट होईल.
दिल्ली संघाची हंगामातील कामगिरी
दिल्ली संघाने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहे. यापैकी फक्त २ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. उर्वरित ३ सामन्यात त्यांनी पराभवाचा सामना केलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
गरमागरमी! फिंच बाद होताच प्रसिद्ध कृष्णाबरोबर झाला वाद, मग गोलंदाजानेही दिले प्रत्युत्तर, पाहा Video
देवदत्त पडीक्कलचा कोलकाताविरुद्ध केवळ २४ धावा करूनही मोठा पराक्रम; विराट-रोहितला पछाडलं
श्रेयस अय्यरचे केकेआरचा प्रशिक्षक मॅक्युलमशीच झाले भांडण? Video व्हायरल