क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असेलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेत आता स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली गेली आहे. याविषयी ऑनलाईन तिकिट विक्री वेबसाईट ‘बुक माय शो’ने सविस्तर माहिती दिली. यापूर्वी मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली गेली होती, ती आता वाढवून ५० टक्के केली गेली आहे.
कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील लीग स्टेजचे सर्व सामने महाराष्ट्रातील ४ स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहे. यामध्ये मुंबईच्या दोन, नवीन मुंबईचे एक आणि पुण्यातील एका स्टेडियमचा समावेश आहे. ज्या चार स्टेडियमवर सामने खेळवले जाणार आहेत, त्यांची नावे वानखडे स्टेडियम (मुंबई), ब्रेबॉर्न्स स्टेडियम (मुंबई), डी वाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई) आणि महाराष्ट्र क्रिकेट अकादमी (एमसीए) स्टेडियम (पुणे) अशी आहेत. महाराष्ट्र सरकारने या चार स्टेडियममध्ये आयपीएल खेळण्यासाठी बीसीसीआयला मान्यता दिली आहे. तसेच २५ टक्के प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये परवानगी दिली होती, जी आता वाढवली आहे.
वेबसाईड ‘बुक माय शो’ने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले आहे. प्रसिद्धीपत्रकात सांगितेल गेले आहे की, पुढच्या काही सामन्यांसाठी तिकिट विक्री सुरू झाली आहे. तसेच बीसीसीआयने स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. ही क्षमता आता २५ टक्क्यांवरून ५० टक्के केली गेली आहे. हा निर्णय भारतीय आणि विदेशी प्रेक्षकांसाठी घेतला गेला आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त संख्येने स्टेडियममध्ये येऊन लाइव्ह सामना पाहता येईल.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गुरुवारी (३१ मार्च) राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध २ एप्रिल पासून उठवले जातील. एवढेच नाही, तर आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालनेही आता सक्तीचे नसेल. राज्यातील कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण जवळपास थांबले आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत की, मास्क लावणे ही प्रत्येकाची स्वतःची इच्छा असेल.
महत्वाच्या बातम्या –
चौदा वर्षे आयपीएल खेळला, पण धोनीने ‘हा’ भीमपराक्रम पहिल्यांदाच केला; मोठा इतिहासही रचला
मुंबईच्या थम्पीने रोहितला प्रेमाने पाडलंय नवं नाव; म्हणाला, ‘तो संघात मला…’
‘मला हे बिलकुल आवडलेलं नाही’, हातातला सामना गमावल्यानंतर ‘जडेजाने’ टोचले धोनीचे कान