---Advertisement---

चेन्नईचं नशीबच फुटकं! मैदानातील लाईट गेल्यामुळे धाकड फलंदाजांना गमवावी लागली विकेट, नेटकऱ्यांकडून आगपाखड

Devon-Conway
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५९वा सामना गुरुवारी (दि. १२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. त्यांनी पहिल्याच षटकात २ विकेट्स गमावले. दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने विकेट घेतली. त्यामुळे ५.४ षटकात ५ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, पहिल्या विकेटदरम्यान स्टेडिअममधील लाईट गेल्याने चेन्नईला मोठा झटका बसला.

हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. नियमानुसार, दोन्ही संघांना प्रत्येकी २ रिव्ह्यू मिळतात. मात्र, या सामन्यात लाईट गेल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये डीआरएस (DRS) घेता आला नाही. त्यामुळे संघाला मोठा झटका बसला. तगड्या फॉर्ममध्ये असलेला डेवॉन कॉनवे (Devon Conway) या सामन्यातील पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याच्या हातून पायचीत झाला. मात्र, रिप्लेमध्ये दिसले होते की, चेंडू कदाचित लेग स्टंपच्या बाहेर जात होता. दुर्दैवाने लाईट नसल्यामुळे त्याला डीआरएस घेता आला नाही.

रॉबिन उथप्पाही झाला पायचीत
सॅम्सने या सामन्यात पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोईन अलीला झेलबाद केले. त्यामुळे तोदेखील खाते न खोलता तंबूत परतला. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पालाही पायचीत केले. उथप्पालाही डीआरएस घेता आला नाही. उथप्पा बाद झाल्यानंतर तब्बल ४ षटके फेकल्यानंतर लाईट पुन्हा आली होती. समालोचन करत असलेला आकाश चोप्रा म्हणाला की, “माझ्या मते, कॉनवे बाद नव्हता. मात्र, पंचांनी त्याला बाद घोषित केले. लाईट नसल्यामुळे संघाला मोठा झटका सहन करावा लागला.” माजी खेळाडू इरफान पठाणने देखील कॉनवे बाद झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केले. यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाडदेखील ७ धावा करत तंबूत परतला.

चेन्नईनेही ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये “काय चाललंय?” असं लिहिले होते.

अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आगपाखड केली आहे. एकाने आयपीएल आणि बीसीसीआयला टॅग करत लिहिले की, “ही थट्टा आहे. तुम्हाला याहून चांगलं करण्याची गरज आहे. डेवॉन कॉनवेबद्दल वाईट वाटतंय. दुर्दैवी.”

सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा संपूर्ण डाव १६व्या षटकातच अवघ्या ९७ धावांवर तंबूत परतला. यावेळी कर्णधार एमएस धोनी सर्वाधिक ३६ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यापूर्वी चेन्नईने आतापर्यंत हंगामात ११ सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४ सामन्यात विजय, तर ७ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या सामन्यात चेन्नई पराभूत झाली, तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

एक तीर, तीन निशाणे! वॉर्नरने झटक्यात विराट, डिविलियर्स अन् गेलला टाकले मागे, पाहा पठ्ठ्याचा कारनामा

यंदाचा आयपीएल हंगाम ‘या’ ५ खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा, यादीत विस्फोटक पठ्ठ्यांचाही समावेश

टी२० विश्वचषकात दिनेश कार्तिकला मिळणार जागा? गावसकर म्हणाले, ‘तुम्ही त्याच्या वयाचा विचार करूच नका’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---