आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात गुरुवारी (२६ मार्च) झाली. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेगेल्या या सामन्यात एमएस धोनी ऐवजी रवींद्र जडेजाने सीएसकेचे नेतृत्व केले. फलंदाजाच्या रूपात धोनी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या नावाच्या घोषणा दिल्या.
सीएसकेला आयपीएलमध्ये ४ वेळा विजेतेपद मिळवून देणारा एमएस धोनी (MS Dhoni) या आयपीएल हंगामात मात्र संघाचे नेतृत्व करणार नाहीये. आयपीएल २०२२ ची सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी सीएसकेचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. रवींद्र जडेजाच्या रूपात सीएसकेला नवीन कर्णधार मिळाला आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. शनिवारी पहिल्या सामन्यात धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा चाहत्यांनी अक्षरशः संपूर्ण वानखडे स्टेडियम डोक्यावर घेतल्याचे दिसले.
मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सर्वत्र धोनीच्याच नावाच गजर ऐकू येत होता. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात आला. चाहत्यांना भावना धोनीला पाहून आपोआप व्यक्त होऊ लागल्या. अनेकांनी धोनीच्या नावाचे पोस्टर्स मैदानात स्वतः सोबत आणले होते. जे ते हवेत उंचावतानाही दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1507742408821276673?s=20&t=syzUavEXX6Jc45YXBCrjKg
धोनी सध्या आयपीएल सर्वात दिग्गज फलंदाज असू शकतो. आयपीएलच्या पुढच्या हंगामात तो खेळेल याची शक्यता फारच कमी आहे. याच कारणास्तव त्याने जडेजाच्या रूपात सीएसकेसाठी एक नवीन कर्णधार तयार करण्याचे काम हातात घेतले आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीच्या खांद्यावरची जबाबदारी थोडी कमी नक्कीच झाली आहे. त्याचा परिणाम मैदानातही दिसला. धोनीने केकेआरविरुद्धच्या या सामन्यात ३८ चेंडू खेळले आणि ५० धावा केल्या.
या अर्धशतकी खेळीनंतर धोनी आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. तो सध्या ४० वर्ष आणि २६२ दिवसांचा आहे. यापूर्वी राहुल द्रविडच्या नावावर हा विक्रम होता. जो धोनीने या सामन्यात मोडला आहे.
महत्वाच्या बातम्या –
कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात जडेजाची अक्षम्य चूक! संघाला टाकले अडचणीत
आता कोहलीतील फलंदाज पुन्हा जागा होणार, यंदा तो १००० धावा करणार; माजी कर्णधाराचे भाकीत
पहिला सामना | केकेआरकडून रहाणेचे पदार्पण, तर सीएसकेकडून धाकड सलामीवीराला संधी; पाहा प्लेइंग XI