आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आमने-सामने असतील. मागच्या हंगामात हे दोन संघ अंतिम सामना खेळले होते, जो सीएसकेने जिंकला होता. मागच्या हंगामातील अंतिम सामना खेळणाऱ्या संघांमध्ये आगामी हंगामाचा पहिला सामना खेळवला जातो. सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता सुरू होणार असून यामध्ये काही महत्वाचे खेळाडू सहभाग घेऊ शकणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया पहिल्या सामन्यासाठी संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन.
अशी असू शकते सीएसकेची प्लेइंग इलेव्हन –
पहिल्या सामन्यासाठी सीएसके (CSK) संघाचे महत्वाचे खेळाडू मोईन अली आणि दीपक चाहर उपलब्ध नाहीत. मोईन अली त्याला भारताचा वीजा वेळेत न मिळाल्यामुळे तो उशीरा संघात सामील झाला आहे, तर चाहरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो एनसीएमध्ये फिटनेस मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अशात हंगामातील या पहिल्या सामन्यात सीएसकेच्या डावाची सुरुवात करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे येऊ शकतात. महीश तीक्षाणा आणि डेवॉन कॉन्वे हे त्यांचे आयपीएल पदार्पण करू शकतात.
सीएसकेची संभावित प्लेइंग इलेव्हन –
ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, डेवॉन कॉन्वे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), एडम मिल्ने, माहीश तीक्षाणा, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, केएल आसिफ.
अशी असू शकते केकेआरची प्लेइंग इलेव्हन
आयपीएल २०२२ च्या सुरुवातीच्या ४ ते ५ सामन्यांसाठी केकेआर (KKR) संघाचे दिग्गज खेळाडू उपलब्ध नसतली. एरॉन फिंच आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ५ एप्रिलपूर्वी भारताता येता येणार नाही. अशा परिस्थितीत वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे केकेआरच्या डावाची सुरुवात करू शकतात. सॅम बिलिंग्स यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. आंद्रे रसल आणि सुनील नारायण अष्टपैलूची भूमिका पार पाडतील.
केकेआरची संभावित प्लेइंग इलेव्हन –
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), अनुकूल रॉय, आंद्रे रसल, सुनील नरेन, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती, टिम साउदी.
अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता स्वतःची ड्रीम इलेव्हन
यष्टीरक्षक – एमएस धोनी आणि सॅम बिलिंग्स.
फलंदाज – ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नितीश राणा.
अष्टपैलू – आंद्रे रसल (उपकर्णधार) सुनील नारायण आणि रवींद्र जडेजा (कर्णधार).
गोलंदाज -टिम साउदी, ड्वेन ब्रावो आणि वरुण चक्रवर्ती.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 : चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये रंगणार उद्घाटन सामना, अशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केकेआरच्या ‘मॅच विनर’ वेंकटेशला WWE रेसलरकडून आयपीएलसाठी खास संदेश, पाहा काय म्हणाला?
दोन फ्रँचायझी वाढल्या तरीही ‘हाच’ संघ सर्वांचा बाप, यंदाही पटकावणार आयपीएल ट्रॉफी! दिग्गजाचे भाकीत