जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वाॅटसनने संघाचा कर्णधार रिषभ पंतचे कौतुक केले आहे. तो म्हणाला आहे की, रिषभने २०१७ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हापासून तो आपल्या खेळात सुधारणा करताना दिसत आहे. तो म्हणाला की, एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून तो वेळेनूसार खूप काही शिकला आहे. त्याची नेतृत्व गुणवत्ता आणि खेळाडूंकडून कामगिरी करवून घेण्याची क्षमता अतिशय प्रभावी आहे.
एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली ४ वेळा आयपीएल (IPL 2022) विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासाठी खेळणारा शेन वाॅटसन म्हणाला की, “पंत आणि धोनीमध्ये काही समानता आहेत, जे दोघांना एकसारखे बनवते, परंतु एक माणूस आणि खेळाडू म्हणून दोघे वेगवेगळे आहेत. पंत सुद्धा आक्रमक क्रिकेट खेळतो, जसा धोनी सुरूवातीला खेळायचा. एवढेच नाही, तर त्याने यष्टीरक्षणामध्ये सुद्धा सुधारणा केली आहे.”
तो म्हणाला की, “सर्वजण एकमेकांपेक्षा वेगळे असतात. सर्वांमध्ये एकमेकांपेक्षा वेगळे कौशल्य असतात. धोनी आणि रिषभ पंत हे दोन्ही वेगवेगळे खेळाडू आहेत. दोघांजवळ चांगली क्षमता आहे. रिषभ एक कर्णधार म्हणून खूप कूल आहे. या बाबतीत तो धोनीसारखा आहे. २४व्या वर्षी त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याची क्रिकेट कारकीर्द पाहता तो खूप लांबचा पल्ला गाठेल असे दिसत आहे.”
आयपीएल २०२१ मध्ये तो दिल्ली संघाचाच भाग होता. त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली संघ प्ले- ऑफपर्यंत पोहोचला असताना केकेआर संघाने दिल्लीला क्वालिफायर- २च्या सामन्यात पराभूत केले. २०२०मध्ये सुद्धा दिल्ली संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता, परंतु आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकला नाही. २०२०मध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत केले. २७ मार्चला दिल्लीचा पहिला सामना मुंबई इंडियन्स संघासोबत खेळणार आहे. आयपीएलमध्ये यावेळी १० संघ खेळणार असून शेवटचा सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चर्चा धोनीच्या उत्तराधिकारीची; रैना म्हणतोय, ‘या’ चार खेळाडूंमध्ये आहे क्षमता