सर्व फ्रँचायझींनी इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२, IPL 2022) साठी तयारीला सुरुवात केली आहे. लवकरच या हंगामासाठी मेगा लिलावही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) (सीएसके) आपली पूर्वतयारी पूर्ण करण्याकडे भर देतो आहे. काही दिवसांपूर्वी सीएसके (CSK)ने संघातील नेतृत्त्वबदलाबद्दल (CSK Captaincy Change) मोठे संकेत दिले होते. परंतु आता सीएसके अधिकाऱ्यांनी नेतृत्त्वबदलावर विरोधी वक्तव्य केले आहे.
सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने गतवर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर पुरस्कार सोहळ्यात म्हटले होते की, तो आपला शेवटचा आयपीएल सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळू इच्छित आहे. याच धर्तीवर धोनी संघातील आपले नेतृत्त्वपद अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला देऊ शकतो. त्यामुळे येत्या हंगामात धोनी सीएसकेच्या मार्गदर्शकाच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे, अशी वृत्ते आली होती. सीएसकेनेही आपल्या ट्वीटर पोस्टद्वारे यासंदर्भात संकेत दिले होते.
परंतु कोविड-१९ महामारीमुळे बीसीसीआय आयपीएलचे सर्व सामने मुंबई आणि पुणे शहरात खेळवण्याची योजना आखते आहे. अशा परिस्थितीत धोनीला या हंगामात कोणताही निर्णय घ्यायचा नसल्याचा समजत आहे. परिणामी आता जडेजाला कर्णधार बनण्यासाठी आणखी वाट पाहावी (Ravindra Jadeja To Wait) लागू शकते.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
सीएसकेच्या एका जवळील सूत्राने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अद्याप सीएसकेत नेतृत्त्वबदलाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही किंवा त्यावर चर्चा झालेली नाही. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. धोनी आमचा कर्णधार आहे. तो सीएसकेचा पहिला खेळाडूही आहे. त्यामुळे सीएसकेचे कर्णधारपद सोडण्याविषयी कोणताही निर्णय घेण्यासाठी तो पूर्णपणे स्वातंत्र्य आहे.
आम्ही सध्या मेगा लिलावावर लक्ष केंद्रित करत आहोत. धोनीही सध्या आयपीएल लिलावाच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये आला आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांमध्ये नेतृत्त्वावरून चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु शेवटचा निर्णय धोनीचाच असेल. एका फलंदाजाच्या रूपात त्याचे प्रदर्शन पूर्वीसारखे राहिलेले नाही. पण तो आपल्या यष्टीरक्षण आणि नेतृत्त्व कौशल्यासह प्रशंसकांचा आवडता खेळाडू बनला आहे. अशात गतवर्षी फलंदाजीत संघर्ष करूनही त्याने सीएसकेला चौथे जेतेपद जिंकून दिले होते, या गोष्टीचा विसर नाही पडला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
सीएसकेची पहिली निवड होता रविंद्र जडेजा
सीएसकेने आयपीएल २०२२ साठी ४ खेळाडूंना संघात कायम केले आहे. यामध्ये एमएस धोनीबरोबर रविंद्र जडेजा आणि मागील हंगामात संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऋतुराज गायकवाड या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच परदेशी खेळाडूच्या रूपात सीएसकेने मोईन अलीला संघात कायम केले आहे. या खेळाडूंची निवड करताना सर्वप्रथम सीएसकेने जडेजाला निवडले होते. त्यानंतर धोनी, मोईन अली आणि ऋतुराज यांची निवड केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
मी कसा काय पडलो? मैदानावर उलट धावताना धपाक्कन कोसळला अंपायर, स्क्रिनवर सर्वांनीच पाहिलं
वेस्ट इंडिजविरुद्ध युवा खांद्यांवर गोलंदाजीची धुरा; ‘या’; दोघांचे होणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?
हेही पाहा-