राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघांमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा सामना शनिवारी (९ एप्रिल) पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने मुंबईला ७ विकेट्सने पराभूत केले. आरसीबीचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे, तर मुंबईला चार ही सामन्यात अपयश आले आहे. या सामन्यादरम्यान एक प्रेक्षक थेट मैदानात घुसल्याचे दिसला. यामुळे सामनाही काही क्षणांसाठी थांबला होता.
दरम्यान, आरसाीबीची पहिली विकेट गेल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. विराट फलंदाजी करत असताना एक प्रेक्षक सुरक्षा मोडत मैदानात आला. त्यावेळी त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधाक रोहित शर्माला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण कोविड-१९ च्या नियमांमुळे बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येण्यास खेळाडूंना बंदी आहे. त्यामुळे रोहित त्याला परत जायला सांगत होता. मात्र, तो चाहता ऐकत नसल्याने रोहितने ‘हवाई मिठी’ दिली म्हणजे चाहत्यासमोर मिठीची फक्त ऍक्शन केली.
हा प्रकार घडत असताना विराटही पाहात होता. रोहितची कृतीपाहून विराटनेही मुंबईच्या कर्णधाराचे कौतुक करत त्याला फिस्ट बंब देण्यासारखा इशारा केला. पण, याचवेळी काही क्षणात सुरक्षा कर्मचारी मैदानात आले आणि त्यांनी मैदानात घुसलेल्या प्रेक्षकाला बाहेर नेले.
https://twitter.com/NaitikSingh28/status/1512846287083012096
Spectator invades on to the field. Tries his best to get a hug from Virat and Rohit before being escorted by policemen off the field #MIvRCB #IPL2022 @TheHinduSports @sportstarweb pic.twitter.com/z2J18TkhB2
— Amol Karhadkar (@karhacter) April 9, 2022
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्स गमावत १५१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६८ धावा केल्या. रोहितने २६ धावा आणि इशान किशनने २६ धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने २ आणि वनिंदू हसरंगाने २ विकेट्स घेतल्या. हे लक्ष्य आरसीबीने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले. अनुज रावतने ६६ धावा केल्या, तर विराट कोहलीने ४८ धावा केल्या. जयदेव उनाडकटने आणि डेवाल्ड ब्रेविसने प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराटच आहे, तसेच त्याने एका हंगामात देखील सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २११ सामन्यांत ३७.३६ च्या सरासरीने ६३८९ धावा केल्या आहेत. विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ५५० चौकार आणि २०० षटकार पूर्ण केले आहेत, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल कोलकाता वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल