आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 Mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडला. या लिलावात जगभरातील ५०० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. यांपैकी २०४ खेळाडूंवर १० फ्रॅंचायझींनी बोली लावली. यामधील १० खेळाडूंवर १० कोटींहून अधिक बोली लागली. सर्वाधिक बोली इशान किशनवर लागली. यावेळी अनेक संघांनी युवा खेळाडूंवर विश्वास ठेवला तर काहींनी खेळाडूच्या अनुभवावर त्याची निवड केली. या लेखात आपण लिलावात विकल्या गेलेल्या ५ सर्वात युवा खेळाडूंबद्दल जाणून घेवूयात.
नूर अहमद: गुजरात टायटन्स
अफगानिस्तानचा नूर अहमद डाव्या हाताचा गोलंदाज आहे. या लिलावात त्याची मुळ किंमत ३० लाख होती. त्याला त्याच किमतीत गुजरात टायटन्स संघाने खरेदी केले आहे. १७ वर्षांचा हा खेळाडू या लिलावातील खरेदीदार मिळालेला सर्वात युवा खेळाडू आहे.
डेवाल्ड ब्रेविस: मुंबई इंडियन्स
दक्षिण आफ्रिकेचा १८ वर्षांचा युवा खेळाडू आणि बेबी एबी या नावाने ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस याला लिलावात मुंबई इंडीयन्स संघाने २० लाखांच्या त्याच्या मुळ किमतीच्या १५ पट जास्त रुपयांना विकत घेतले आहे. तो या लिलावातील दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. तो डाव्या हाताची फलंदाजीसह गोलंदाजी सुद्धा उत्तम करतो. ब्रेविसने यावर्षीच्या १९ वर्षाखालील विश्वचषकामध्ये ५०० हुन अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांसह एका शतकाचा सामावेश आहे.
अनीश्वर गौतम: राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर
अनीश्वर गौतमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याच्या २० लाखांच्या मूळ किंमतीत विकत घेतले आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला अनीश्वर १९ वर्षांचा आहे. कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू अनिश्वर डाव्या हाताने फलंदाजी तसेच फिरकी गोलंदाजी सुद्धा करतो.
राज बावा: पंजाब किंग्ज
हिमाचल प्रदेशचा युवा क्रिकेटपटू राज अंगद बावा याने नुकतीच १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. १९ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्जने त्याच्या २० लाखांच्या मूळ किंमतीच्या बदल्यात दोन कोटींमध्ये खरेदी केले. बावाने अंतिम सामन्यात १६२ धावांची नाबाद खेळी खेळली आणि ५ विकेट्स घेतल्या.
यश धुल: दिल्ली कॅपीटल्स
१९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार यश धुल याला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले आहे. धुलने १९ वर्षाखालील विश्वचषकात शानदार फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. त्याला त्याच्या २० लाखांच्या मूळ किमतीच्या दुप्पट म्हणजेच ५० लाख रुपयांना विकत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आता महिला क्रिकेटपटूंवरही बरसणार पैसा; वाचा सविस्तर
टी२० मोड ऑन! ‘रोहितसेना’ लागली सरावाला, वनडेनंतर टी२०तही विंडीजला देणार पराभवाचा धक्का?
पटणा पायरेट्सची विजयी घोडदौड सुरूच, बंगळुरू बुल्सला २ गुणांच्या फरकाने केले चितपट