टी२० क्रिकेट प्रकारामध्ये जगात अनेक लीग खेळवल्या जातात. त्यातील इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. यंदा या आयपीएलचा पंधरावा हंगाम जोषात पार पडला. यामध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांनी पदार्पण केले. या दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते, तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्या आयपीएल हंगामाची सुरूवात उत्तम केली.
आयपीएल २०२२चा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. रविवारी (२९ मे) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानला ७ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांच्या दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या आशेवर पाणी फेरले.
या हंगामात गुजरातकडून खेळणारा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) हा अधिक विकेट्स घेण्यात अयशस्वी झाला असला तरी त्याचा फलंदाजावर दबाव दिसून येत होता. त्याने अंतिम सामन्यात ४ षटकात ४.५०च्या इकॉनॉमी रेटने १८ धावा देत एक विकेट घेतली होती.
अफगाणिस्तानच्या या गोलंदाजाने आयपीएलबरोबरच पाकिस्तान सुपर लीग, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग या स्पर्धांही खेळल्या आहेत. त्याला यामधील कोणती स्पर्धा आवडते याचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
“आयपीएलच्या विजेत्या संघाचा सभासद होणे ही एक विशेष बाब आहे. यांसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे आणि विजेतेपद जिंकणे यासाठी खूप मेहनत करावी लागते. आयपीएल जिंकणे हा माझ्या कामगिरीतील महत्वाचा टप्पा ठरला आहे,” अशा शब्दांत राशिदने आयपीएलविषयी प्रेम व्यक्त केले आहे.
आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यावर आनंदी झालेला राशिद म्हणाला, “आम्ही खेळपट्टी पाहिली असता त्यावर १५०च्या आसपास धावा करणे अवघड वाटत होते. त्यासाठी सगळ्यांनाच आपली जबाबदारी पार पाडणे महत्वाचे होते. तसेच आम्ही केले आणि विजयी झालो याबाबत आम्ही आनंदी आहोत.”
“शुबमन गिल हा आमच्या संघात आहे हे खूप महत्वाचे आहे. कारण, तो एक असा फलंदाज आहे ज्याला आमच्यासारखे गोलंदाज गोलंदाजी करू पाहत नाही,” असे म्हणत राशिदने गिलच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे.
आयपीएलमध्ये गुजरातचा उपकर्णधार असलेल्या २३ वर्षीय राशिदने या आयपीएलमध्ये फलंदाजांना त्रास दिला आहे. अनेक सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत विरोधी संघाला अधिक धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने १६ सामन्यांत ६.६०च्या इकॉनॉमी रेटने १९ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022मध्ये सगळ्यात जास्त धावा करूनही बटलर निराश, अंतिम सामन्यात फेकून दिले हेल्मेट, पाहा Video
‘सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या, पण…’ अनेक विक्रम तोडूनही बटलर ‘या’ कारणाने निराश
गुजरातचे प्रशिक्षक कर्स्टन म्हणातेय, ‘नेहराबरोबर काम करण्याची मजाच वेगळी, तो…’