इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या हंगामात ८ पराभवांचा सामना केलेल्या मुंबई इंडियन्सला शुक्रवारी (दि. ०६ मे) सूर गवसला. हंगामातील ५१व्या सामन्यात त्यांनी गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केलेल्या गुजरात टायटन्स संघाला ५ धावांनी धूळ चारली. या विजयात डॅनियल सॅम्सने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात तब्बल ११ विक्रम रचले गेले आहेत. त्याच विक्रमांवर आपण नजर टाकणार आहोत.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७७ धावा चोपल्या आणि गुजरातपुढे १७८ धावांचे आव्हान उभे केले होते. जे गुजरात संघाला पार करता आले नाही. त्यांना ५ विकेट्स गमावत फक्त १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने ५ धावांनी सामना खिशात घातला.
WE WIN!!!!! ????????????
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022
हे आहेत ते ११ विक्रम
१. आजच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्स संघाने एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या. मुंबईसाठी ही या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या आहे.
२. गुजरात टायटन्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा मुंबई इंडियन्स संघ दुसरा संघ बनला आहे.
३. गुजरातविरुद्ध पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी ही या हंगामातील मुंबईची सर्वात मोठी भागीदारी आहे.
४. रोहित शर्माने गुजरातविरुद्ध खेळताना पॉवरप्लेमध्ये आयपीएल २०२२मधील पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक ४२ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
५. राहुल तेवतियाने या हंगामात गोलंदाजी करताना केलेली नकोशी कामगिरी
षटके- ६, धावा- ७६, विकेट- ०, इकॉनॉमी रेट- १२.६७
६. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर या आयपीएल हंगामात १९ षटकार लागले आहेत. त्यामुळे तो असे करणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे.
७. आजच्या सामन्यातील मुंबई इंडियन्सचा डाव
पॉवरप्ले- ६३/० (रन रेट- १०.५०)
मधली षटके- ५७/४ (रन रेट- ६.३३)
अखेरची षटके- ५७/२ (रन रेट- ११.४०)
८. या हंगामात पॉवरप्लेमधील वृद्धिमान साहाची कामगिरी
डाव- ६, धावा- १४९, बाद- १ वेळा, सरासरी- १४९.००, स्ट्राईक रेट- १४३. २६
९. आयपीएल २०२२मध्ये १००+ धावांची भागीदारी
१८२ धावा- ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे (विरुद्ध हैदराबाद, पुणे)
१५५ धावा- जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल (विरुद्ध दिल्ली, वानखेडे)
१०० धावा- वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल (विरुद्ध मुंबई, ब्रेबॉर्न)
१०. या हंगामात दुसऱ्यांदा हार्दिक पंड्याला ब्रेबॉर्न मैदानावर यष्टीरक्षकाने धावबाद केले. दोन्ही वेळा बाद होताना त्याचा सहकारी डेविड मिलर होता.
११. ‘हिटमॅन’ रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी २०० षटकारांचा आकडा पार केला. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा दुसरा खेळाडू ठरला. पहिल्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे. त्याने २५७ षटकार मारले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टेबल टॉपर’वर भारी पडली मुंबई इंडियन्स, गुजरातच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणत ५ धावांनी मिळवला विजय
रोहितच्या शानदार सिक्सरमुळे काझीरंगातील गेंड्यांना ५ लाखांची मदत; कशी ते एका क्लिकवर घ्या जाणून
शेवटी रोहितची बॅट तळपलीच! विस्फोटक फलंदाजी करत ‘हिटमॅन’ बनला मुंबईचा दुसरा ‘सिक्सर किंग’