इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये उमेश यादवने शानदार कामागिरी केली आहे. त्याने ८ विकेट्स घेतल्या आहेत आणि सध्या त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. त्याने आपल्या यशाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
तो म्हणाला एकेकाळी २०१५ मध्ये विश्वचषकात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. परंतु, यानंतर अचानक सगळं बदलले. त्याने सांगितले की, त्याचा संघर्ष एकदिवसीय आणि टी२० मध्ये २०१४ साली सुरु झाला. याबद्दल त्याने केकेआर फ्रॅंचायझीच्या युट्यूब चॅनलवर सांगितले आहे.
तो म्हणाला की, “मला वाईट वाटले, जेव्हा मी माझ्या कारकिर्दीत चढ-उतारांचा सामना केला. जेव्हा मी भारतासाठी मर्यादीत षटकांच्या संघातून आत-बाहेर होऊ लागलो. लोक माझ्याबद्दल बोलायला लागले की, मी मर्यादीत षटकांच्या प्रकारामधील गोलंदाज नाही आणि माझ्यासोबत जेव्हा असे व्हायला लागले, तेव्हा मला समजले की लगेचच गोष्टी कशा बदलतात. माझ्या कारकिर्दीत मी एकेकाळी २०१५ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू होतो आणि नंतर सगळं अचानक बदललं. हे माझ्यासाठी निराशाजनक होते.”
उमेश (Umesh Yadav) आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलताना म्हणाला, “मी जेथून आहे, तेथे खूप कमी मुले आहेत, जी भारतासाठी खेळण्याची स्वप्ने बघतात. क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणे त्याच्यासाठी कठिण होते. किट, बॅट, पॅड, शूज इ. तुम्ही हे करू शकत नाही. कारण तुम्ही कोळशाच्या खाणीत राहता, तुमचे वडील कोळशाच्या खाणीत जातात आणि कष्ट करतात. त्यावेळी मी भारतासाठी खेळेन, असे कधीच वाटले नव्हते. कारण हे माझ्या कल्पनेपलिकडचे होते.”
विश्वचषक २०१५ मध्ये उमेशने ८ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या होत्या. तो भारताकडून त्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. तसेच त्यावेळी त्याने एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांवर आलेला. त्याच्या अगोदर रॉजर बिन्नीने १९८३ च्या विश्वचषकात १८ विकेट्स घेतल्या होत्या. सध्या एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा गोलंदाज झहीर खान आहे. त्याने २०११ च्या विश्वचषकात २१ विकेट्स घेतल्या आहेत.
विश्वचषक २०१५ नंतर उमेश यादव भारतासाठी टी२० आणि एकदिवसीय प्रकारामध्ये संघातून कधी आत, तर कधी बाहेर असे करत राहिला, ज्याचा प्रभाव त्याच्या कामगिरीवर पडला. याच कारणामुळे त्याला २०१९ च्या विश्वचषकात समाविष्ट करण्यात आले नाही. पण आयपीएलच्या १५ व्या हंगामात त्याने उत्तम खेळी खेळत चाहत्यांना हैराण करुन सोडले आहे. त्याने केवळ ३ सामन्यातच ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईकडून पहिल्या ३ सामन्यात घोर निराशा, ‘त्या’ मॅच विनर खेळाडूची आठवण काढत जडेजा म्हणाला…
धोनीच्या प्राणामिकपणाने जिंकले हृदय! स्वत:हून पंचांना म्हणाला, आधी रिप्ले पाहा, मग निर्णय द्या