---Advertisement---

‘कर्णधार रोहित सामन्यादरम्यान खेळाडूंना करतो शिवीगाळ’, इशानने मोठा खुलासा करत सांगितले कारण

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 6:54 PM
Ishan Kishan and Rohit Sharma
---Advertisement---

सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग २०२२ची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत या हंगामातील १२ सामने झाले आहेत. राजस्थान रॉयल्स संघ यापैकी त्यांचे दोन्हीही सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद अशा संघांना अद्याप त्यांचे खाते खोलता आलेले नाही. त्यातही आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईसाठी यंदाच्या हंगामाची सुरुवात अतिशय निराशाजनक राहिली आहे. त्यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरुवातीचे दोन्हीही सामने गमावले आहेत.

दरम्यान मुंबई संघाचा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) याने रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाबद्दल मोठा (Ishan Kishan On Rohit Sharma’s Captaincy) खुलासा केला आहे. कर्णधार रोहित मैदानावर असताना खेळाडूंना शिवीगाळ करत असल्याचे इशानने म्हटले आहे.

‘ब्रेकफास्ट विद चँपियन्स’ या कार्यक्रमात बोलताना इशानने रोहितच्या नेतृत्त्वाबद्दल उलगडे केले आहेत. तो म्हणाला की, “रोहित सामन्यादरम्यान खेळाडूंकडून चूक झाल्यास त्यांना शिवीगाळ करतो. मात्र सामन्यानंतर तो सर्वांना हेही सांगतो की, माझ्या बोलण्याला मनावर घेत जाऊ नका. पण असे फक्त मैदानावरच होत असते.” 

तसेच पुढे बोलताना इशान म्हणाला की, “एकदा प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने मला सामन्यादरम्यान १-२ धावा घेण्यास सांगितले होते. परंतु रोहित माझ्याजवळ आला होता आणि म्हणाला होता की, तुला जे करायचे आहे ते कर. रोहित नेहमी संघातील खेळाडूंना पूर्ण मोकळीक देत असतो.”

एकदा इशानला खावे लागले होते बोलणे
इशानने पुढे सांगितले की, “बऱ्याचदा सामन्यादरम्यान चेंडू जुना झाल्यामुळे संघाला फायदा मिळत असतो. असेच एका सामन्यात खूप दव पडले होते. परंतु मी विचार केला होता की, जर चेंडू मैदानावर फेकून दिला, तर संघाला त्याचा फायदा होईल. मी तो चेंडू मैदानावरील गवतावर रगडत रोहितकडे फेकला होता. त्यानंतर रोहितने खिशातून रुमाल बाहेर काढला आणि चेंडू पुसत मला ऐकवू लागला. तेव्हा मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भुवनेश्वरच्या प्रयत्नांचे व्हायला पाहिजे कौतुक! बाउंड्री लाईनवर असे करत आणली ‘मिस्टर ३६०’ची आठवण

इंस्टाग्रामवर व्यंकटेश आणि तेलुगु अभिनेत्रीचे ‘क्यूट’ चॅट व्हायरल; चाहते म्हणे, ‘यांच्यात काहीतरी शिजतय’

वेगवेगळ्या संघांकडून खेळत असले तरीही बॉन्डिंग तीच! चहल आणि मॅक्सवेलच्या भेटीचे फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---