मुंबई। रविवारी (१० एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) चौथा डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. रविवारचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तसेच दिल्लीने त्यांच्या ११ जणांच्या संघात एक बदल केला असून त्यांनी एन्रीच नॉर्कियाच्या ऐवजी खलील अहमदला संधी दिली आहे.
या सामन्यापूर्वी कोलकाताने या हंगामात खेळलेल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून ते गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच दिल्लीने तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला असून दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे आता या सामन्यातून कोलकाता विजयाची लय कायम ठेवण्याचा, तर दिल्ली विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करणार आहे.
आमने-सामने कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ ( (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) आत्तापर्यंत २९ सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. यामध्ये दिल्लीने १२ वेळा विजय मिळवले आहेत. तसेच कोलकाताने १६ विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
🚨 Team News 🚨@KKRiders remain unchanged. @DelhiCapitals make 1⃣ change as Khaleel Ahmed is named in the team.
Follow the match ▶️ https://t.co/4vNW3LXMWM#TATAIPL | #KKRvDC
A look at the Playing XIs 🔽 pic.twitter.com/AoIeiV4OD0
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022
असे आहेत ११ जणांचे संघ
कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
महत्त्वाच्या बातम्या –
वडिल सायकलपटू, पण मुलगा बनला क्रिकेटर; आता थेट मुंबई इंडियन्सकडून केले आयपीएल पदार्पण
चौथा पराभव पत्करला, तरीही मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी