मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील पहिले सात सामने पार पडले असून आता आठवा सामना शुक्रवारी (१ एप्रिल) होणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असलेल्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. तत्पूर्वी संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी असू शकते ड्रीम ११ हे पाहू.
असा असू शकते कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ
यंदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने या हंगामात २ सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे, तर दुसरा पराभूत झाला आहे. त्यामुळे आता तिसरा सामना खेळत असलेला कोलकाता संघ अंतिम ११ जणांमध्ये फारसा बदल करण्याची शक्यता कमी आहे. तरी त्यांना आंद्रे रसलच्या दुखापतीची चिंता असेल. जर रसेल पूर्ण फिट नसला तर मोहम्मद नबीला संधी मिळू शकते.
तसेच पंजाबविरुद्ध देखील अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजी करू शकतात. तर मधली फळी नितीश राणा, सॅम बिलिंग्ससह कर्णधार श्रेयस अय्यर सांभाळू शकतो. त्यांना यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनचीही साथ मिळेल. त्याचबरोबर रसेल किंवा नबीसह सुनील नारायण अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळवू शकतो. याबरोबरच गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त टीम साऊदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर असू शकते.
कोलकाता नाईट रायडर्सचा संभावित संघ (KKR Predicted XI)
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल/मोहम्मद नबी, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
असा असू शकतो पंजाब किंग्सचा संभावित संघ
मयंक अगरवालच्या नेतृत्त्वाखालील खेळणाऱ्या पंजाब किंग्सने या हंगामात आत्तापर्यंत एक सामना खेळला असून तो सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांना हीच विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. दरम्यान, कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी पंजाब संघ देखील विजयी संघात फारसा बदल करण्याची शक्यता नाही.
त्यांच्याकडून मयंक अगरवाल आणि शिखर धवन सलामीला फलंदाजी करू शकतात. तसेच भानुका राजपक्षे यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. त्याचबरोबर तो मधल्या फळीत अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन, राज बावा, शाहरुख खान आणि ओडियन स्मिथ यांच्याबरोबर फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर गोलंदाजी फळीची भिस्त हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, राहुल चाहर आणि संदीप शर्मा यांच्यावर सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्सचा संभावित संघ (PBKS Predicted XI)
मयंक अगरवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, राज बावा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, राहुल चाहर, संदीप शर्मा.
अशी असू शकते ड्रीम ११
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (KKR vs PBKS) यांच्यातील ड्रीम ११ बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून भानुका राजपक्षे आणि शेल्डन जॅक्सन यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच फलंदाजीत श्रेयस अय्यर, मयंक अगरवाल, शिखर धवन चांगली कामगिरी करू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन संघात स्थान मिळवू शकतात. गोलंदाजांचा विचार करायचा झाल्यास उमेश यादव, टीम साऊदी, राहुल चाहर यांना संधी दिली जाऊ शकते. ड्रीम ११ मध्ये वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल यांच्यातील अष्टपैलू क्षमता पाहाता त्यांना कर्णधार आणि उपकर्णधार केले जाऊ शकते.
कर्णधार – वेंकटेश अय्यर
उपकर्णधार – आंद्रे रसेल
यष्टीरक्षक – भानुका राजपक्षे, शेल्डन जॅक्सन
फलंदाज – श्रेयस अय्यर, मयंक अगरवाल, शिखर धवन
अष्टपैलू – वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, लियाम लिव्हिंगस्टोन
गोलंदाज – उमेश यादव, टीम साऊदी, राहुल चाहर
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…