शनिवारी (१४ मे) आयपीएल २०२२ चा ६१ वा सामना खेळला गेला. पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या. त्यांचा अष्टपैलू आंद्रे रसेलने अवघ्या २८ चेंडूत नाबाद ४९ धावा चोपल्या आणि काही खास विक्रम देखील बनवले.
आंद्रे रसेल (Aandre Russell) या सामन्यात जबरदस्त अंदाजात फलंदाजी करत होता. त्याने या ४९ धावा तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने बनवल्या आहेत. यादरम्यान त्याने स्वतःच्या २००० आयपीएल धावा पूर्ण केल्या. या धावा त्याने आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात सर्वात कमी चेंडूत केल्या आहेत. अवघ्या ११२० चेंडूंमध्ये रसेलने वैयक्तिक २००० आयपीएल धावा केल्या आहेत. सर्वात कमी चेंडूंत २००० आयपीएल धावा करणाऱ्यांमध्ये त्याने विरेंद्र सेहवाग (१२११ चेंडू) आणि ख्रिस गेल (१२५१ चेंडू) सारख्या दिग्गजांना मागे टाकल पहिला क्रमांक पटकावला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्याचसोबत तो सर्वाधिक वेळा एका हंगामात २५० धावा आणि १० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा खेळाडू देखील ठरला. त्याने ही कामगिरी सर्वाधिक चार वेळा केली आहे. चालू हंगामात त्याने १३ सामन्यांतील ११ डावांमध्ये ३३० धावा केल्या आहेत. या याबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस आणि कायरन पोलार्ड यांनाही मागे टाकले आहे. कॅलिसने आयपीएलमध्ये तीन वेळा एका हंगामात २५० पेक्षा अधिक धावा आणि १० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या. पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि शेन वॉटसन यांनी ही कामगिरी प्रत्येकी दोन वेळा केली आहे.
चालू हंगामातील त्याचा स्ट्राईक रेट १८२.३२, सरासरी ४१.२५ राहिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शशांकने अडवला रहाणेचा सिक्स, बाउंड्री लाईनवर घेतला अनपेक्षित झेल; पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारा कॅच
‘टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली असती, पण…’, आरसीबीसाठी खेळलेल्या क्रिकेटरचे गाऱ्हाणे