आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवीर बीसीसीआयने फेब्रुवारी महिन्यात मेगा लिलाव घेतला होता. मेगा लिलावात अनेक युवा खेळाडू कोट्याधीश बनले, तर काही दिग्गज असे राहिले ज्यांना खरेदीदार मिळाले नाहीत. चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनावर देखील कोणत्याच आयपीएल फ्रेंचायझीने बोली लावली नाही. श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकाराने रैना अनसोल्ड राहण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
श्रीलंका संघाचा महान फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याच्या मते आयपीएल संघ आता नाव आणि भूतकाळातील प्रदर्शनापेक्षा भविष्याला अधिक महत्व देत आहेत. सुरेश रैना (Suresh Raina) मेगा लिलावात अनसोल्ड राहण्यामागचे कारण सांगताना संगकारा म्हणाला की, “याकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसा जसा वेळ जातो, खेळाडूही बदलत राहतात आणि युवा खेळाडूंकडून नवीन नावलौकीक तयार केला जातो.”
“असेच सुरेस रैनाच्या बाबतीतही आहे. आयपीएलमध्ये त्याचे नाव उत्कृष्ट आहे. तो एक अप्रतिम खेळाडू राहिला आहे. तो एकापाठोपाठ एका हंगामात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्यांपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही बारीक निरीक्षण करता, तेव्हा वाटते की सुरेश रैना आगामी हंगामासाठी उपयोगाचा नाहीय… हे सर्व निरिक्षण एक क्रिकेटचा तज्ञ, प्रशिक्षक आणि संघमालक पाहत असतात,” असे संगकारा पुढे बोलताना म्हणाला.
संगकाराने संजू सॅमसनचेही कौतुक केले. तो म्हणाला, “तुम्ही त्याला (संजू सॅमसन) कर्णधाराच्या रूपात पाहा किंवा भविष्यातील राजस्थानच्या खेळाडूच्या रूपात पाहा. तो टी-२० प्रकारातील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. संजूमध्ये ती प्रत्येक क्षमता आहे, जी तुम्हाला एका टी-२० खेळाडूमध्ये हवी असते.”
दरम्यान, राजस्थान रॉयल्सला आगामी आयपीएल हंगामातील त्यांच्या अभियानाची सुरुवात २९ मार्चला करायची आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबात यांच्यातील हा सामना पुण्यामध्ये होणार आहे. आगामी हंगामासाठी राजस्थानने एक जबरदस्त संघ तयार केला आहे. त्यांनी रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ड, शिमरॉन हेटमायर, जिमी निशाम, देवदत्त पडिक्कल यांसारखे खेळाडू मेगा लिलावात खरेदी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
सतरंगी यारी, रंगीबेरंगी होली; दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी धूमधडाक्यात साजरी केली होळी- Video
IPL 2022 | नवीन इनिंग सुरू करण्यासाठी डेल स्टेन भारतात दाखल, यंदा दिसणार ‘या’ भूमिकेत
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून