---Advertisement---

IPL2022| लखनऊ वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: गुरूवार, एप्रिल 7, 2022 12:25 PM
DC-vs-LSG
---Advertisement---

मुंबई। गुरुवारी (७ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात १५ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार आहे. डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू. 

असा असू शकतो लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ 
लखनऊ सुपर जायंट्सने आत्तापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या चौथ्या सामन्यातील संभावित ११ जणांच्या (LSG Predicted XI) संघाबद्दल विचार करायचा झाल्यास कर्णधार केएल राहुलबरोबर (KL Rahul) यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजी करेल.

तसेच मधली फळी सांभाळण्यासाठी मनिष पांडे, एव्हिन लुईस, आयुष बदोनी बरोबर अष्टपैलू दिपक हुडा असू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून कृणाल पंड्या आणि जेसन होल्डरलाही संघात संधी मिळू शकते. गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त दुश्मंता चमिरा, रवी बिश्नोई आणि अवेश खानवर असू शकते.

लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ – केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनिष पांडे, एव्हिन लुईस, आयुष बदोनी, दिपक हुडा, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमिरा, रवी बिश्नोई, अवेश खान.

असा असू शकते दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ 
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवात मिश्र झाली आहे. त्यांनी खेळलेल्या २ सामन्यांपैकी १ सामना जिंकला आहे आणि १ सामना पराभूत झाला आहे. आता संघाला तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी दिल्लीच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (DC predicted XI) बोलायचे झाल्यास डेव्हिड वॉर्नरचे (David Warner) संघात आगमन होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे लखनऊविरुद्ध पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी खेळताना दिसू शकते. त्याचबरोबर मधल्या फळीत मनदीप सिंगसह कर्णधार पंत (Rishabh Pant), ललित यादव असू शकतात. अष्टपैलू खेळाडू म्हणून रोवमन पॉवेलला संधी मिळू शकते. तर, गोलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एन्रीच नॉर्किया आणि मुस्तफिजूर रेहमान यांच्यावर असू शकते.

दिल्ली कॅपिटल्सचा संभावित संघ – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, रिषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एन्रीच नॉर्किया, मुस्तफिजूर रेहमान.

अशी असू शकते ड्रीम ११ 
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणाऱ्या सामन्याच्या ड्रीम ११ बद्दल विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि क्विंटन डी कॉकला संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल, आयुष बदोनी, पृथ्वी शॉ यांना संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून जेसन होल्डरची निवड होऊ शकते. तर गोलंदाजीत एन्रीच नॉर्किया, आवेश खान आणि कुलदीप यादव यांच्यावर विश्वास दाखवला जाऊ शकतो. कर्णधार केएल राहुल आणि उपकर्णधार जेसन होल्डरला केले जाऊ शकते.

कर्णधार – केएल राहुल
उपकर्णधार – जेसन होल्डर
यष्टीरक्षक – रिषभ पंत, क्विंटन डी कॉक
फलंदाज – डेव्हिड वॉर्नर, केएल राहुल, आयुष बदोनी, पृथ्वी शॉ
अष्टपैलू – जेसन होल्डर
गोलंदाज – एन्रीच नॉर्किया, आवेश खान, कुलदीप यादव

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल लखनऊ वि. दिल्ली सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

व्वा गुरुजी! तीन असे प्रशिक्षक, ज्यांनी संघाला कमीत कमी दोनदा जिंकून दिलीय आयपीएल ट्रॉफी

चेन्नई पुढे मुंबई मागे-मागे, IPLमध्ये दोन्ही संघाबाबत काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात, वाचा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---