जगातील सर्वात मोठी टी२० लीग असणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. २६ मार्चपासून सुरू झालेल्या या हंगामातील आतापर्यंत ४ सामने पार पडले आहेत. सोमवारी (२८ मार्च) आयपीएलचा चौथा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. हा सामना गुजरात संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान लखनऊ संघाच्या दोन खेळाडूंनी सर्वांची मने जिंकली. ते दोन खेळाडू म्हणजे दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या होय. त्यांनी असं काय केलं, आणि त्यानंतर त्यांच्यावर मिम्सचा पाऊस पडला, ते आपण जाणून घेऊया…
खरं तर मागील वर्षी रणजी ट्रॉफीदरम्यान दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya) यांच्यात मोठे वाद झाले होते. मात्र, आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने जेव्हा हुड्डा आणि पंड्यावर बोली लावली, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सोमवारी गुजरात टायटन्सविरुद्ध आपला पहिलाच आयपीएल सामना खेळताना सर्वांना सुखद धक्का देणारी घटना घडली. ती म्हणजे, हुड्डा आणि पंड्याची गळाभेट.
झाले असे की, लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या होत्या. लखनऊने दिलेल्या १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड सलामीला आले होते. यावेळी सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गिलने जोरदार फटका मारला. मात्र, हा चेंडू डाईव्ह मारत लखनऊच्या हुड्डाने झेलला. यानंतर लखनऊचाच अष्टपैलू असलेल्या कृणाल पंड्याने हुड्डाची गळाभेट घेतली. यानंतर सर्वांनाच सुखद धक्का बसला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, सोशल मीडिया युजर्स हुड्डा आणि पंड्याचे भांडण मिटल्यामुळे आणि त्यांच्यात मैत्री झाल्यामुळे मिम्सचा पाऊस पाडत आहेत.
Legendary moment….😁😁#KrunalPandya #deepakhooda #GTvLSG #IPL2022 pic.twitter.com/CrognxQL8D
— Pratik Bhoir (@Im_PratikBhoir) March 28, 2022
एका युजरने ट्वीट करत राम आणि रावणाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले आहे की, “दीपक हुड्डा आणि हार्दिक पंड्या एकत्र आले.”
https://twitter.com/MyFreakyTweets/status/1508477870665965568?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508477870665965568%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fkrunal-hugged-hooda-after-seeing-the-best-catch-memes-came-on-twitter-1572368
दुसऱ्या एका युजरने अक्षय कुमार आणि सलमान खानचा फोटो शेअर करत लिहिले की, “शुबमन गिलचा झेल घेतल्यानंतर हुड्डा आणि पंड्या.”
After shubman catch
Hooda and krunal #IPL2022 #GTvLSG #GTvsLSG #ipl @VhoraNisarg pic.twitter.com/TZcBNa6n3e— Jay Patel (@Jay240996) March 28, 2022
याव्यतिरिक्त इतर युजर्सनीही मिम्स शेअर केले आहेत.
Krunal after every boundary by Hooda pic.twitter.com/c4X16vzVfG
— Prithvi (@Puneite_) March 28, 2022
https://twitter.com/smileandraja/status/1508453143159398411?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508453143159398411%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fkrunal-hugged-hooda-after-seeing-the-best-catch-memes-came-on-twitter-1572368
https://twitter.com/Amrendra7Kumar/status/1508461719286579201?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1508461719286579201%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fkrunal-hugged-hooda-after-seeing-the-best-catch-memes-came-on-twitter-1572368
That Hooda-Krunal hug had same energy to this legendary hug. pic.twitter.com/y7MNgOXQRC
— Akash (@Akashkumarjha14) March 28, 2022
Krunal and hooda 😍😍😍 pic.twitter.com/bwXS1w51vc
— @ (@Meme_Canteen) March 28, 2022
दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या (Deepak Hooda And Krunal Pandya) यांच्या सामन्यातील कागमिरीबद्दल बोलायचं झालं, तर हुड्डाने ४१ चेंडूत ५५ धावांची वादळी खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ६ चौकार ठोकले. याव्यतिरिक्त पंड्याने फलंदाजी करताना २१ धावा केल्या, तर गोलंदाजी करताना त्याने १ विकेटही आपल्या नावावर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कृणालने बाद केल्यानंतर काय वाटले? हार्दिक म्हणतो, ‘जर आम्ही पराभूत झालो असतो तर…’
IPL2022| हैदराबाद वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सला जेतेपद जिंकून देणारा ‘स्वप्निल असनोडकर’