आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम जसजसा जवळ येत आहे, संघांना काहीना काही वाईट बातम्या मिळू लागल्या आहेत. आगामी आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआधी लखनऊ सुपरजायंट्स संघाला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला दुखापत झाली आहे, जो लखनऊ संघाचा भाग आहे.
वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील एंटीगा कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना मार्क वुड (Mark Wood) याला दुखापत झाली आहे. त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर सूज आली. वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात तो पुढे गोलंदाजी करू शकलेला नाही. डावात त्याने फक्त चार षटके गोलंदाजी केली आणि त्याच्या कोपऱ्याला ही दुखापत झाली. वुडची ही दुखापत जोफ्रा आर्चरप्रमाणेच आहे. आर्चरलाही २०२१ मध्ये कोपऱ्याला दुखापत झाली होती आणि सूजही आलेली. त्यानंतर आर्चरच्या कोपऱ्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया झाली आणि तो मागच्या एक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे.
मार्क वुडसाठी लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मेगा लिलावात ७.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. वुडकडे १४५ किमीच्या ताशी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याने नुकत्याच खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेत सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या होत्या. लखनऊकडे मार्क वुडला पर्यायी गोलंदाज आहे, तो म्हणजे श्रीलंकेचा दुष्मंता चमीरा. असे असले तरी, वुडची दुखापत जर गंभीर असली तर, लखनऊ सुपर जायंट्सच्या प्लेइंग इलेव्हनचे समीकरण बिघडू शकते.
दरम्यान, आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडव्यतिरिक्त इतरही वेगवान गोलंदाजांवर बोली लागली आहे. त्यांच्या संघात अंकित राजपूत आणि आवेश खान सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. असे असले तरी, त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख मार्क वुड आहे. जर त्याची दुखापत गंभीर नसेल, तर सुरुवातीच्या एक दोन सामने सोडले, तर तो आयपीएलमध्ये खेळू शकतो. पण जर दुखापत गंभीर असेल, तर संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर होऊ शकतो.
लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ –
केएल राहुल, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, मनन वोहरा, एविन लुईस, मार्कस स्टोयनिस, कृष्णप्पा गौतम, कर्ण शर्मा, जेसन होल्डर, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बदोनी, रवि बिश्नोई, मार्क वुड, दुष्मंता चमीरा, अंकित राजपूत, मोहसिन खान, शाहबाज नदीम, आवेश खान और मयंक यादव.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानात पोहोचला ‘सर जडेजा’! आफ्रिदीने भारतीय फिरकीपटूच्या गोलंदाजीची केली नक्कल, झाला ट्रोल
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना






