---Advertisement---

CSK vs SRH: हैदराबादचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघांकडून ‘या’ खेळाडूंचे झाले आयपीएल पदार्पण

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 3:13 PM
Ravindra-Jadeja-and-Kane-Williamson
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (९ एप्रिल) डबल हेडर खेळवला जाणार आहे. त्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. हा हंगामातील १७ वा सामना असून डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता नाणेफेक झाली. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हैदराबादकडून शशांक सिंग आणि मार्को जेन्सन यांनी पदार्पण केले आहे. हे दोन बदल हैदराबादच्या अंतिम ११ जणांच्या संघात झाले आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्सने अंतिम ११ जणांच्या संघात एक बदल केला असून महिश तिक्षणाला संधी देण्यात आली आहे. यातील शशांक सिंग आणि महिश तिक्षणा या दोघांचेही हे आयपीएल पदार्पणही असेल.

आमने-सामने कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad) संघ आत्तापर्यंत १६ वेळा आयपीएलमध्ये आमने-सामने आले आहेत. यात चेन्नईने १२ वेळा आणि हैदराबादने ४ वेळा विजय मिळवला आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 
चेन्नई सुपर किंग्स – रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महिश तिक्षणा, मुकेश चौधरी

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सेन, उमरान मलिक, टी नटराजन

महत्त्वाच्या बातम्या – 

‘कौतुक करावे तेवढे कमीच’, हार्दिक पंड्या ‘मॅचविनर’ राहुल तेवतियावर भलताच खुश

“आम्ही १००% त्याच्यासोबत आहोत…”, सामन्यात ‘व्हिलन’ बनलेल्या गोलंदाजाला मयंक अगरवालचा भक्कम पाठिंबा

इंग्लंड विरुद्ध भारत मालिकांचे वेळापत्रक जाहीर, स्थगित झालेली पाचवी कसोटीही होणार ‘या’ तारखेला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---