---Advertisement---

IPL 2022| हैदराबादसमोर विजयीरथावर स्वार गुजरातचे आव्हान; केव्हा आणि कुठे होणार सामना, घ्या जाणून

Hardik-Pandya-Kane-Williamson
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात सोमवारी (११ एप्रिल) २१ वा सामना होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा हा हंगामातील चौथा सामना असणार आहे. तसेच गुजरात टायटन्स संघाचा देखील हा चौथा सामना आहे. 

गुजरात टायटन्स संघ सध्या विजयी रथावर स्वार आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवला आहे. तर, हैदाराबादची कामगिरी समाधानकारक झाली आहे. त्यांनी तीन सामन्यांपैकी पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकरला होता, तर तिसऱ्या सामन्यात त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले.

असे असतील संभावित संघ 
हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या गुजरातसाठी आता विजयी लय कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. त्यांच्या चौथ्या सामन्यासाठीच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (GT predicted XI) विचार करायचा झाल्यास मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

याआधीच्या सामन्यांप्रमाणेच शुबमन गिल आणि यष्टीरक्षक मॅथ्यू वेडकडे सलामीची जबाबदारी असू शकते. तसेच मधल्या फळीत साई सुदर्शन, डेव्हिड मिलर यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि अभिनव मनोहर यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत राशिद खानसह लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नळकांडे यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.

दुसरीकडे केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला मिळालेली विजयी लय कायम ठेवण्यासाठी गुजरातविरुद्ध दमदार कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यासाठी संभावित ११ जणांच्या हैदराबाद संघाचा (SRH predicted XI) विचार करायचा झाल्यास युवा अभिषेक शर्मासह कर्णधार केन विलियम्सन सलामीला उतरू शकतात.

तसेच मधल्या फळीत खेळण्यासाठी त्यांच्याकडे राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पुरन आणि शशांक सिंग असे पर्याय आहेत. तर अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर असू शकतो. गोलंदाजी फळीत भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, टी नटराजन यांच्यासह उमरान मलिक किंवा कार्तिक त्यागीला संधी दिली जाऊ शकते.

आमने-सामने
गुजरात टायटन्स हा संघ आयपीएलमध्ये १५ व्या हंगामापासून सहभागी झाला आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांचा सनरायझर्स हैदराबाद संघाशी सामना झालेला नाही.

हवामान आणि खेळपट्टी 
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans) संघात डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी (Dr DY Patil Sports Academy, Mumbai) येथे सामना होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांना मदतशीर आहे. तसेच या मैदानावर गोलंदाजांना उसळी देखील मिळते. पण त्याचबरोबर संध्याकाळी सामना होणार असल्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडण्याचाच निर्णय कर्णधार घेण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यावेळी मुंबईतील तापमान २९ ते ३० डिग्री सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच साधारण ७५ टक्के आद्रता असण्याची शक्यता आहे.

आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) हैदराबाद विरुद्ध गुजरात (SRH vs GT) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…

१. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना ११ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.

२. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे खेळवला जाईल.

३. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.

४. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ 
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडेन मार्करम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन, श्रेयस गोपाळ, जगदीशा सुचित, रविकुमार समर्थ, ग्लेन फिलिप्स, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, रोमारियो शेफर्ड, फजलहक फारुकी, अब्दुल समद, सौरभ दुबे.

गुजरात टायटन्स – मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे, जयंत यादव, विजय शंकर, वरुण ऍरॉन, वृद्धिमान सहा , प्रदीप सांगवान, गुरकीरत सिंग मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, यश दयाल, नूर अहमद.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

चहलच्या शिरपेचात मानाचा तुरा! बनला IPLमध्ये वेगवान १५० विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू, ‘भज्जी’लाही पछाडलं

पहिल्या षटकात ट्रेंट बोल्टचेच राज्य, आयपीएलमध्ये २०२२नंतर तब्बल १२ वेळा केली ‘ही’ कामगिरी

केएल राहुल आला, बोल्टने पाहिला अन् थेट तंबूतही धाडला, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘झक्कास’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---