यावर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (IPL 2022) १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहायला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांमुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. लिलावाच्या पहिल्या दिवशी असे काही घडले, ज्याची कोणी कल्पनाही केली नसावी. ऑक्शनीयर ह्युज एडमीड्स मध्येच चक्कर येऊन जमिनीवर कोसळले.
एडमीड्स जेव्हा खाली पडले, तेव्हा शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हैराण झाल्याचे दिसली. शनिवारी (१२ फेब्रुवारी) मेगा लिलावाचा पहिला दिवस होता. मेगा लिलाव बेंगलोरमध्ये घेतला जात आहे. पहिल्या दिवशी श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगाचा लिलाव सुरू होता. सर्व फ्रेंचायजी त्याला संघात सामील करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. अशातच ऑक्शनर ह्युज एडमीड्स बेशुद्ध झाले आणि खाली पडले. एडमीड्स यांची अवस्था पाहून सुहाना खानने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
Mohalle ki aunties when they see you with a guy !#SuhanaKhan #IPL2022MegaAuction #IPL2022 pic.twitter.com/OS2myou9u1
— Anmol Kaur (@anmol_banga) February 12, 2022
शाहरुख खान आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्सचा मालक आहे. परंतु तो स्वतः मेगा लिलावासाठी उपस्थित नव्हता. त्याची दोन्ही मुले आर्यन खान आणि सुहाना खान यांनी ही जबाबदारी पार पाडली. जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताही त्यावेळी कोलकाताच्याच टेबलवर उपस्थित होती. जुही चावला ही केकेआरची सहमालकीण आहे. एडमीड्स यांना चक्कर आल्यानंतर आर्यन आणि सुहाना दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. सुहाना खानच्या चेहऱ्यावर त्यावेळी जी प्रतिक्रिया दिसत होती त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
They Are Looking At Situation !!
Aryan Khan
Suhana Khan Shocked Reaction #AryanKhan #SuhanaKhan #IPLMegaAuction2022 pic.twitter.com/s5x2ak2UVj— Fan Of SRK (@SRKs_Superstar) February 12, 2022
दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा आयपीएलचा लिलाव अशाप्रकारे मध्येच धांबवावा लागला असेल. एडमीड्सला चक्कर आल्यानंतर काही वेळ लिलाव धावंबला गेला आणि हसरंगाचा अर्ध्यात थांबलेला लिलाव काही वेळानंतर पूर्ण केला गेला. एडमीड्स यांच्यानंतर त्यांच्या जागी चारू शर्मा यांनी ऑक्शनरची भूमिका पार पाडली.
महत्वाच्या बातम्या –
IPL Auction: ‘लॉर्ड’ ठाकूर झाला ‘दिल्लीकर’! शार्दुलला १० कोटींहून अधिक रकमेची लागली बोली
IPL Auction | चेन्नईच्या प्रमुख गोलंदाजाला बंगळुरुने ओढले जाळ्यात, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
बाबोव! कॅप्टन रोहितपेक्षाही जास्त पैसे कमावत इशानची वाढली शान, बनला सर्वात महागडा मुंबईकर