इंडियन प्रीमियर लीग २०२१ (IPL 2022) चा हंगाम लवकरच सुरू होणार असून त्या अनुषंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय,BCCI) तयारीला लागले आहे. सुरुवातीला बीसीसीआयने सर्व सहभागी १० आयपीएल फ्रँचायझींना ठराविक खेळाडूंना संघात कायम करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मेगा लिलावात (Mega Auction) सहभागी होणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादीही जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
यानंतर आता मेगा लिलावात सर्व फ्रँचायझींकडे काही ठराविक रक्कमेतच खेळाडूंना खरेदी करावे लागेल. मेगा लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझीकडे ९० कोटींचे बजेट आहे. यातील बऱ्याचशा फ्रँचायझींनी रिटेंशनमध्ये कमी-जास्त पैसा खर्च केला आहे. त्यामुळे आता मेगा लिलावासाठी या फ्रँचायझींकडे किती पैसे शिल्लक (IPL Franchise Budget) (Purse Price) आहेत? तसेच कोणती फ्रँचायझी किती खेळाडूंना विकत घेऊ शकेल?, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ.
चेन्नई सुपर किंग्ज
बजेट: ४८ कोटी
खेळाडूंची जागा: २१
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
दिल्ली कॅपिटल्स
बजेट: ४७.५ कोटी
खेळाडूंची जागा: २१
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
कोलकाता नाईट रायडर्स
बजेट: ४८ कोटी
खेळाडूंची जागा: २१
परदेशी खेळाडूंचे स्थानः ६
लखनऊ सुपर जायंट्स
बजेट: ५९ कोटी
खेळाडूंची जागा: २२
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
मुंबई इंडियन्स
बजेट: ४८ कोटी
खेळाडूंची जागा: २१
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
पंजाब किंग्ज
बजेट : ७२ कोटी
खेळाडूंची जागाः २३
परदेशी खेळाडूंचे स्थानः ८
राजस्थान रॉयल्स
बजेट : ६२ कोटी
खेळाडूंची जागा: २२
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बजेट: ५७ कोटी
खेळाडूंची जागा: २२
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
सनरायझर्स हैदराबाद
बजेट : ६८ कोटी
खेळाडूंची जागा: २२
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
अहमदाबाद
बजेट: ५२ कोटी
खेळाडूंची जागा: २२
परदेशी खेळाडूंचे स्थानः ७
महत्त्वाच्या बातम्या-
‘पप्पा’ कधी ‘कोटी’ खाली उतरले नाहीत, आता बेटा किती मिळवणार? पाहा ‘ज्युनियर तेंडुलकर’ची बेस प्राईज
मेगा लिलावात ४८ खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये, जाणून घ्या पडिक्कलपासून ते रायुडूपर्यंतची नावे
पहिल्याच हंगामात आरसीबीने पैशांचा पाऊस पाडल्याने विराट झालेला चकित, २००८च्या आठवणीत झाला भावुक