आयपीएल २०२२ चा पहिला डबल हेडर रविवारी, २७ मार्चला खेळला जाणार आहे. यामध्ये दुपारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा आमना-सामना होईल. या दोन्ही संघांमध्ये मोठ्या खेळाडूंची भरमार आहे. मुंबईसाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन चांगले प्रदर्शन करू शकतात, तर दिल्लीसाठी रिषभ पंत आणि पृथ्वी शॉकडून अपेक्षा असतील. चाहत्यांना या सामन्यासाठी स्वतःचा ड्रीम इलेव्हन तयार करण्यासाठी उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया मुंबई-दिल्ली सामन्यासाठी तुम्ही स्वतःच्या ड्रीम इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना सहभागी करू शकता.
यष्टीरक्षक –
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) या सामन्यात रिषभ पंत आणि ईशान किशन हे दोन यष्टीरक्षक असतील. पंतने मागच्या हंगामातील १६ सामन्यांमध्ये ३४.९१ च्या सरासरीने ४१९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४७.४६ आहे आणि तो संघासाठी वेगात धावा करू शकतो. दुसरीकडे ईशान किशनने मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या १६ चेंडूत स्वतःचे अर्धशतक केले होते. त्याने या सामन्यात ३२ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. तसेच राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने २५ चेंडूत अर्धशतक केले होते. अशात ड्रीम इलेव्हनमध्ये ईशान किशनला कर्णधार आणि रिषभ पंतला उपकर्णधार बनवू शकता
फलंदाज –
फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, सरफराज खान आणि टिम डेविड यांना संघात सामील करू शकतो. रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत २१३ सामन्यांमध्ये १३०.३९ च्या ट्राईक रेटने ५६११ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून रोहित सलामीसाठी आल्याचे पाहायला मिळेल. पृथ्वी शॉचा विचार केला, तर त्याने मागच्या हंगामात दिल्लीसाठी १५९.१३ च्या ट्राइक रेटने ४७९ धावा केल्या होत्या. अशात या खेळाडूलाही संघात सामील करू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात सरफराज खानला विकत घेतले. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने टिम डेविडसाठी मेगा लिलावात तब्बल ८.२५ कोटी रुपये खर्च केले. टिम डेविड हार्दिक पंड्याप्रमाणेच मोठे षटकार खेळू शकतो. अशात हे दोन्ही फलंदाजही चांगले गुण मिळवून देऊ शकतात.
अष्टपैलू –
या सामन्यात अष्टपैलूच्या रूपात तुम्ही कायरन पोलार्ड आणि ललित यादव यांना संघात घेऊ शकतो. पोलार्ड फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही अप्रतिम कमगिरी करू शकतो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत आणि ६५ विकेट्सही घेतल्या आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचा ललित यादवही धमाका करू शकतो. त्याचा टी-२० मधील स्ट्राइक रेट १४५.४१ आहे. त्याने ४७ टी-२० सामन्यांमध्ये ३२ विकेट्सही घेतल्या आहेत.
गोलंदाज –
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मयंक मार्कंडे यांना तुम्ही संघात सामील करू शकता. बुमराहने आयपीएमध्ये १०६ सामन्यात १३० विकेट्स घेतल्या आहेत आणि तो कोणत्याही सामन्यात संघला विजय मिळवून देऊ शकतो. शार्दुल ठाकुरने मागच्या हंगामात सीएसकेसाठी १६ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो फलंदाजीतही कमाल करू शकतो. मयंक मार्कंडेचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ८.५४ च्या इकोनॉमीने १८ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २८ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर
धमाकेदार खेळीनंतर सोशल मीडियावर धोनी भाऊचीच चर्चा! चाहते आनंदात
IPL2022 | कोलकाताकडून CSKची धूळधाण, गतसालच्या पराभवाचा वचपा काढत हंगामात KKRची विजयी सुरुवात