मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (१६ एप्रिल) डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवला जाणार आहे. शनिवारचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळवला जाणार आहे, त्याआधी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता नाणेफेक होईल. दरम्यान, या सामन्यासाठी कशी असू शकते ड्रीम ११ याबद्दल जाणून घेऊ.
असा असू शकतो मुंबई इंडियन्सचा संभावित संघ –
आयपीएल २०२२ मध्ये सध्या एकही विजय न मिळवणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. त्यांना पहिल्या पाचही सामन्यात अपयश आले असून अद्याप पहिल्या विजयाची आस आहे. आता त्यांना सहावा सामना केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या संभावित प्लेइंग इलेव्हनबद्दल (MI predicted XI) विचार करायचा झाल्यास मोठा बदल दिसण्याची शक्यता कमी आहे.
मुंबईकडून इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला उतरू शकतात. तसेच मधली फळी डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव हे सांभाळू शकतात. तसेच कायरन पोलार्ड हा अष्टपैलू म्हणून चांगला पर्याय असेल. त्याचबरोबर फॅबियन ऍलेनलाही संधी मिळू शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहसह मुरुगन अश्विन, टायमल मिल्स यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर जयदेव उनाडकट किंवा बासिल थंपी यांच्यापैकी एकाची निवड प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकते.
मुंबई इंडियन्सचा संभाविक संघ – इशान किशन, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलेन, जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जयदेव उनाडकट/बासिल थंपी.
असा असू शकतो लखनऊ सुपर जायंट्स संघ
लखनऊ संघाने आत्तापर्यंत ५ सामने खेळले असून ३ सामने जिंकले आहेत. आता संघाला सहावा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवत चौथा विजय मिळवण्याचा लखनऊचा मानस असेल. या सामन्यासाठी लखनऊच्या संभावित प्लेइंग इलेव्हनबद्दल (LSG Predicted XI) विचार करायचा झाल्यास कर्णधार केएल राहुलबरोबर क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो.
तसेच अष्टपैलू दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी मधली फळी सांभाळू शकतात, तर कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर या अष्टपैलू खेळाडूंनाही संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजीत कृष्णप्पा गॉथम, दुश्मंता चमिरा, रवी बिश्नोई आणि अवेश खान यांना संधी मिळू शकते.
लखनऊ सुपर जायंट्सचा संभावित संघ – केएल राहुल, क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गॉथम, दुश्मंता चमिरा, रवी बिश्नोई, अवेश खान.
अशी असू शकते ड्रीम ११
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स) यांच्यात सामन्यातील फँटेसी ११ बद्दल विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांना निवडले जाऊ शकते. तसेच सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि आयुष्य बदोनी यांना फलंदाजी फळीत निवडू शकतो. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून जेसन होल्डर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच गोलंदाजीसाठी आवेश खान, रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन हे उत्तम ठरतील. तसेच कर्णधार म्हणून तुफान फॉर्ममध्ये असलेल्या डेवाल्ड ब्रेविसला निवडू शकतो, तसेच उपकर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) ड्रीम ११
कर्णधार – डेवाल्ड ब्रेविस
उपकर्णधार – सूर्यकुमार यादव
यष्टीरक्षक – क्विंटन डी कॉक, केएल राहुल
फलंदाज – सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, आयुष्य बदोनी
अष्टपैलू – जेसन होल्डर, डेवाल्ड ब्रेविस
गोलंदाज – अवेश खान, रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या पठ्ठ्यानं गाजवलं मैदान, अवघ्या २१ चेंडूत झळकावलं हंगामातलं दुसरं वेगवान अर्धशतक
‘मुंबई इंडियन्स अजूनही चॅम्पियन आहे…’ पत्रकाराच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवचे सडेतोड प्रत्युत्तर