मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (१६ एप्रिल) डबल हेडर म्हणजेच एका दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. या दिवसातील पहिला सामना हा हंगामातील २६ वा सामना असून मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होत आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी सामन्यात नाणेफेक पार पडली असून मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून फॅबियन ऍलेनने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले आहे. त्याला कायरन पोलार्डकडून मुंबईच्या पदार्पणाची कॅप प्रदान करण्यात आली. तसेच लखनऊ संघात एक बदल करण्यात आला असून मनिष पांडेला अंतिम ११ जणांमध्ये कृष्णप्पा गॉथमच्या जागेवर संधी मिळाली आहे.
या सामन्यातून मुंबईला हंगामातील पहिल्या विजयाची आस आहे. त्यांना यापूर्वी १५ व्या आयपीएल हंगामात खेळलेल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, लखनऊ संघही मुंबई संघासमोर मजबूत आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. लखनऊने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने पराभूत झाले आहेत.
🚨 Toss Update 🚨@ImRo45 has won the toss & @mipaltan have elected to bowl against @LucknowIPL.
Follow the match ▶️ https://t.co/8aLz0owuM1#TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/LUWdKJuBsg
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यासाठी असे आहेत ११ जणांचे संघ –
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुश्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई
महत्त्वाच्या बातम्या –
देश बदलला, पण तिथेही पुजाराची हाराकिरी सुरूच! १५ चेंडूत ‘इतक्या’ धावा करत झालाय बाद
‘खूप थकल्यासारखं वाटतंय’, श्रेयस अय्यरने हैदराबादविरुद्धच्या पराभवामागील कारण केले स्पष्ट
IPL 2022| दिल्ली वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!