आयपीएलच्या चालू हंगामात नव्याने सहभागी झालेला संघ लखनऊ सुपरजायंट्स एखाद्या अनुभवी संघाप्रमाणे प्रदर्शन करत आहे. रविवारी (२४ एप्रिल) लखनऊने मुंबई इंडियन्सला ३६ धावांनी धूळ चारली. यामध्ये त्यांचा कर्णधार केएल राहुलचे योगदान बहुमूल्य राहिले. राहुलने केलेल्या शतकी खेळीमध्ये एक शॉट असा मारला, ज्यावर गोलंदाज आणि मैदानी पंच जखमी होता-होता वाचले.
केएल राहुल (KL Rahul) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात ६२ चेंडू खेळले आणि यामध्ये नाबाद १०३ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १२ चौकार आणि ४ षटकार निघाले. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी आला होता. उनाडकटच्या या षटकातील शेवटच्या तीन चेंडूवर केएल राहुलने सलग तीन षटकार ठोकले. उनाडकटने षटकातील पाचवा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने त्याचे चौकारात रूपांतर केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
उनाडकटने टाकलेला हा यॉर्कर योग्य टप्प्यावर पडला नाही. राहुलने त्याच्या याच चुकीचा पूर्ण फायदा घेतला आणि गोलंदाजाच्या डोक्यावरून कडक शॉट खेळला. उनाडकटने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो खूपच वेगात होता आणि थेठ सीमारेषेपार जाऊन थांबला. यादरम्यान, चेडू पंचांना देखील जखमी करू शकत होता, पण त्यांनी वेळीच स्वतःला वाचवले. लॉन्ग ऑनवर कायरन पोलार्ड क्षेत्ररक्षणासाठी उभा होता, पण त्यालाही चेंडू आडवता आला नाही.
https://twitter.com/rishobpuant/status/1518254943227957248?s=20&t=jmlQo7w_rti-58JRUY3Rzw
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक जिंकून मुबईने प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला लक्ष्य गाठता आले नाही. मुंबईने २० षटकात ८ विकेट्स गमावल्या आणि १३२ धावा केल्या. मुंबईचा हंगामातील हा सलग आठवा पराभव असून त्यांना अद्याप एकही विजय मिळालेला नाहीय.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने हंगामात केलेले हे दुसरे शतक आहे. विशेष बाब म्हणजे राहुलने हंगामातील दोन्ही शतके मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातच केली आहेत. आता राहुलच्या नावावर आयपीएल कारकिर्दीत एकूण ४ शतकांची नोंद झाली आहे. डेविड वॉर्नर आणि संजू सॅमसनला त्याने या बाबतीत मागे सोडले आहे, ज्यांच्या नावावर प्रत्येकी ३ आयपीएल शतकांची नोंद आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुलेटच्या वेगाने आला चेंडू, तरीही १५ यार्डच्या आत रोहितचा खतरनाक कॅच; पाहून फलंदाजही अचंबित
मुंबई इंडियन्सने पत्करला सलग ८ वा पराभव! ‘रोहितसेने’ला महागात पडतायत ‘या’ ३ चूका
कोणासी सांगावे कळेना! ‘माझे अर्धे पैसे दंड भरण्यातच जातात’, सामना विजयानंतर केएल राहुलचे गाऱ्हाणे