मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (२ एप्रिल) डबल हेडर असणार आहे, म्हणजेच दोन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना हा हंगामातील नववा सामना असेल. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. हे दोन्ही संघ या हंगामात अ गटात आहेत. त्यामुळे यंदा या दोन संघात दोन सामने होणार असून शनिवारी होणारा हा सामना या हंगामातील या दोन संघांमधील पहिला सामना आहे. तसेच या दोन्ही संघांचा हंगामातील हा प्रत्येकी दुसरा सामना आहे.
मुंबईने या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळला, ज्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला, तर राजस्थानने त्यांचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला. या सामन्यात राजस्थानने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे आता शनिवारी मुंबईचा विजयी मार्गावर परतण्याचा, तर राजस्थानचा विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या दोन संघातील कोणाच्या प्रयत्नांना यश मिळणार हे पाहावे लागेल.
असे असू शकतात संभावित संघ
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू सूर्यकुमार यादव संघात दाखल झाला असून त्याचे राजस्थानविरुद्ध पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो मधल्या फळीत अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांच्यासह खेळू शकतो. तसेच सलामीची जबाबदारी यष्टीरक्षक इशान किशन आणि रोहित शर्मा यांच्यावर असेल.
तसेच पोलार्डसह अष्टपैलू म्हणून डॅनियल सॅम्सही असेल. त्याचबरोबर गोलंदाजीची भिस्त मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पीवर असू शकते.
राजस्थान रॉयल्सच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास यशस्वी जयस्वाल यष्टीरक्षक जोस बटलरबरोबर सलामीला उतरू शकतो. तसेच मधल्या फळीत युवा देवदत्त पडीक्कलसह कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson), शिमरॉन हेटमायर हे फलंदाजी करू शकतात. त्याचबरोबर रियान परागला अष्टपैलू म्हणून संधी मिळू शकते, तर गोलंदाजीची सर्वाधिक भिस्त आर अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांच्यावर असू शकते.
आमने-सामने कामगिरी
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आत्तापर्यंत २६ वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये १४ वेळा मुंबई इंडियन्सने आणि १२ वेळा राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तसेच डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर हे दोन संघ एकवेळा आमने-सामने आले असून या सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. शनिवारी होणारा सामनाही याच स्टेडियमवर होणार आहे.
हवामान आणि खेळपट्टी
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर सामना होणार आहे. या स्टेडियमवर चेंडूला चांगली उसळी मिळते. तसेच या मैदानाची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीला मदतगार असते. तसेच हवामान उष्ण असेल. तापमान साधारण ३६ डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. तसेच वारा ताशी १९ किमीच्या वेगाने वाहू शकतो, तर आद्रता साधारण ३४ टक्के असेल.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) मुंबई विरुद्ध राजस्थान (MI vs RR) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामना २ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामना डॉ. डी वाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी ३.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
राजस्थान रॉयल्स संघ: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, नॅथन कुल्टर-नाईल, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, जेम्स निशम, रॅसी व्हॅन डर डुसेन, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, ओबेद मॅककॉय, तेजस बरोका, कुलदीप यादव, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, फॅबियन ऍलन, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल २८ वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे ११ नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बापरे! २०११ विश्वविजेत्या संघातील १६ पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
MI vs RR: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ धाकड खेळाडूचे होणार पुनरागमन, पाहा संभावित संघ