एमएस धोनी याने चाहत्यांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. २०००च्या दशकात आलेल्या या क्रिकेटपटूने त्याच्या खेळाच्या कौशल्याने सगळ्यानांच वेड लावून सोडले आहे. कॅप्टन कूल आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व अशी ओळख असलेला धोनी क्रिकेटविश्वातच सर्वाधिक प्रसिद्ध नसून तो सर्वसामन्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार असलेला धोनी (MS Dhoni) याचे हृदय मोठे असून चाहत्यांना तो का प्रिय आहे? हे एका घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यामध्ये त्याने एका दिव्यांग चाहतीला भेट दिल्याचा फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मंगळवारी (३१ मे) धोनी चेन्नईकडे जाणाऱ्या फ्लाईटसाठी रांची विमानतळावर उपस्थित होता. त्यावेळी त्याची लावण्या पिलानीया या चाहतीशी भेट झाली.
“त्याच्याशी झालेल्या भेटीचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तो एक चांगला माणूस आहे. त्यानी माझी माझी विचारपूस करत माझ्याशी हात मिळवला तेव्हा ‘रोना नहीं’ असे म्हणत माझे अश्रू पुसले. मी त्याचे चित्र काढले आहे, त्याबद्दल त्याने माझे आभार मानले आणि ‘मै ये ले जाऊंगा’ असे म्हटले. यादरम्यान त्याने माझ्याशी जे शब्द बोलले ते आयुष्यात मी कधीच विसरणार नाही”, अशा शब्दांत लावण्याने धोनीच्या फोटोसह इंन्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
तसेच लावण्याने धोनीने दिलेल्या वेळेचे आभार मानत ३१ मे २०२२ हा दिवस माझ्यासाठी नेहमीच विशेष राहिल असेही म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CeOBUjuBO80/?utm_source=ig_web_copy_link
चेन्नई संघानेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवर लावणयाशी भेट झालेल्या धोनीचे फोटो पोस्ट करत त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
King of 💛s who spreads Yellove #EverywhereHeGoes!#Thala #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/La2YCDlbzD
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 31, 2022
पूर्व आयपीएल विजेत्या चेन्नई संघाचा २०२२चा आयपीएल हंगाम निराशाजनक राहिला. ते १४ पैकी चारच साखळी सामने जिंकत गुणतालिकेतील शेवटून दुसऱ्या स्थानावर होते.
चार वेळेचा आयपीएल विजेत्या संघासाठी हा आयपीएल हंगाम कर्णधार पदावरून चांगलाच चर्चेत आला होता. यावेळी रवींद्र जडेजाने सुरूवातीच्या काही सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना ते जमले नसल्याने मध्येच सोडले होते. नंतर धोनीने पुन्हा संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतली. मात्र तरीही संघाची स्थिती बिकटच होती. उर्वरित राहिलेल्या सहा सामन्यांमध्ये त्याने संघाचे नेतृत्व करताना दोनच सामन्यांत संघाला यश मिळवून दिले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोकांनी तूला संपल्यात जमा केले होते, पण तू…’, आयपीएल जिंकल्यानंतर हार्दिकचं भाऊ कृणालकडून कौतुक
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत