---Advertisement---

ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! पहिल्याच आयपीएल सामन्यात चर्चेत आली ‘मिस्ट्री गर्ल’

On: रविवार, मार्च 27, 2022 1:50 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची रणधुमाळी सुरू झाली आहे. शनिवारी (२६ मार्च) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात आयपीएलचा पहिला सामना झाला. केकेआरने ६ विकेट्स राखून सामना जिंकत गतवर्षीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. या सामन्यादरम्यान खेळाडूंच्या प्रदर्शनाइतकीच किंवा त्यापेक्षा जास्त चर्चा झाली एका महिला दर्शकाची. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत.

आयपीएल (IPL 2022) ही अशी जागा आहे, जिथे काही सेकंदांसाठी जरी एखादा दर्शक टीव्हीवर दिसला, तर तो क्षणात देशभरात व्हायरल होतो. त्यातही एखादी सुंदर मुलगी टीव्हीवर दिसली तर सोशल मीडियावर तिची तुफान चर्चा रंगते. सीएसकेची फलंदाजी सुरू असतानाही असेल (CSK vs KKR) काहीसे झाले. 

सीएसकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ५२ धावा अशा स्थितीत होता. संघाची दयनीय स्थिती पाहून सामना पाहायला आलेली एक मुलगी खूप हताश झाल्याची दिसत होती. याचवेळी कॅमेरामनने तिच्यावर कॅमेरा फिरवला आणि तिची रिऍक्शन कॅमेरात कैद केली. यानंतर त्या सौंदर्याची खाण असलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांनी तिच्यावर वेगवेगळे मीम्सही बनवले आहेत. (Mystery Girl)

https://www.instagram.com/p/CbmLH-qqcra/?utm_source=ig_web_copy_link

इतकेच नव्हे तर, त्या ‘मिस्ट्री गर्ल’ला टीव्ही स्क्रिनवर दाखवण्यात मोठा हात असलेल्या कॅमेरामनलाही मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेकांनी कॅमेरामनला ट्रोल करत ट्वीटरवर लिहिले आहे की, ‘पहिला आयपीएल सामना सुरू होताच कॅमेरामन त्याच्या कामाला लागला आहे.’ 

https://twitter.com/theCricketHolic/status/1507739063708647425?s=20&t=4GlnPEX9vNwkVvYR2ascag

https://twitter.com/samishaikh_/status/1507749267020337156?s=20&t=LWdf8MNik-I4fVwNtUjr-Q

तसे तर आयपीएल सामन्यादरम्यान अशा मिस्ट्री गर्ल चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याचदा आयपीएलदरम्यान मिस्ट्री गर्ल्सची चर्चा रंगली आहे. यापैकी एक मिस्ट्री गर्ल, जी आयपीएलप्रेमींच्या हृदयाची धडधड वाढवते, ती म्हणजे काव्या मारन. काव्या ही आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सह-संघमालकाची मुलगी आहे. ती या संघाचा कारभार सांभाळते. हैदराबाद संघाच्या सामन्यावेळी ती स्टेडियममध्येही उपस्थित असते. अशावेळी आयपीएलप्रेमी तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

लाईव्ह आयपीएल सामन्यादरम्यान जागे झाले धोनीचे फुटबॉल प्रेम, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

आजचा सामना: कधी, केव्हा आणि कुठे होणार पंजाब-बेंगलोर सामना, जाणून घ्या एका क्लिकवर

PBKS vs RCB| दोन नव्या कर्णधारांची कसोटी, अशी असू शकते पंजाब-बेंगलोर संघांची प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---