इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाचे बिगूल वाजले असून आता लिलावात असणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादीही जाहीर झाली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, आता ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
आयपीएलचा हा १५ वा हंगाम असणार असून या हंगामासाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) पार पडणार आहे. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर बोली लागण्याची शक्यता आहे.
लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या खेळाडूंचा तपशीलवार
आयपीएल २०२२ लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या ५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू किमान एक तरी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले म्हणजे कॅप खेळाडू आहेत. तसेच ३५५ अनकॅप खेळाडू म्हणजेच अजून आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेले खेळाडू आहेत. याबरोबरच ७ खेळाडू सहयोगी देशातील आहेत.
तसेच ५९० खेळाडूंपैकी ३७० खेळाडू भारतीय असून २२० खेळाडू परदेशी आहेत. त्याचबरोबर देशांनुसार विभागणी करायची झाल्यास भारताचे ३७० खेळाडू असून याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ४७ खेळाडूंचा यात समावेश आहे. त्याचबरोबर अफगाणिस्ताचे १७, बांगलादेशचे ५, इंग्लंडचे २४, आयर्लंडचे ५, न्यूझीलंडचे २४, दक्षिण आफ्रिकेचे ३३, श्रीलंकेचे २३, वेस्ट इंडिजचे ३४, झिम्बाब्वेचे १, नामिबियाचे ३, नेपाळचे १, स्कॉटलंड २ आणि अमेरिकेचा १ खेळाडू आहे. (IPL 2022 Player Auction list announced)
हे स्टार खेळाडू असणार लिलावात
या ५९० खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव, सुरेश रैना, देवदत्त पडीक्कल, कुलदीप यादव असे अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच फाफ डू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शकीब अल हसन, वानिंदू हसरंगा यांसारख्या स्टार परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
???????????? ???????????????????? ???????? ???????????? ???????????????? ???????????????????????????? ????????
A bidding war on the cards ???????? ????????
Here are the 1⃣0⃣ Marquee Players at the 2⃣0⃣2⃣2⃣ #IPLAuction ???? pic.twitter.com/lOF1hBCp8o
— IndianPremierLeague (@IPL) February 1, 2022
किती खेळाडूंची किती किंमत?
या ५९० खेळाडूंमधील ४८ खेळाडूंनी त्यांची लिलावासाठी मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. तसेच २० खेळाडूंची मूळ किंमत १.५ कोटी आहे. ३४ खेळाडूंनी १ कोटींच्या मूळ किंमतीसाठी आपले नाव नोंदवले आहे. याशिवाय ५९० खेळाडूंमधील अनेक खेळाडू ७५ लाख, ५० लाख आणि २० लाख मूळ किंमत असलेल्या यादीत आहेत.
लिलावात असणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी पाहाण्यासाठी इथे क्लिक करा.
दोन दिवस होणार लिलाव
तसेच बीसीसीआयने माहिती दिली आहे की, हा लिलाव दोन दिवस पार पडेल. यामध्ये सर्व १० संघ वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावताना दिसतील. आत्तापर्यंत १० संघांनी मिळून ३३ खेळाडूंना संघात कायम केले आहे. त्याचबरोबर लिलावानंतर प्रत्येक फ्रांचायझीला आपला संघात जास्तीत जास्त २५ खेळाडूंनाच सामील करता येणार आहे. त्यामुळे आता लिलावात जास्तीत जास्त केवळ २१७ खेळाडूंवर बोली लागू शकते. यात जास्तीत जास्त ७० परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो.
आयपीएल लिलाव २०२२ फ्रँचायझींचा तपशील
१. चेन्नई सुपर किंग –
उर्वरित किंमत – ४८ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २१ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – रविंद्र जडेजा, एमएस धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड
२. मुंबई इंडियन्स –
उर्वरित किंमत – ४८ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २१ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड
३. दिल्ली कॅपिटल्स –
उर्वरित किंमत – ४७.५ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २१ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रीच नॉर्किया.
४. कोलकाता नाईट रायडर्स –
उर्वरित किंमत – ४८ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २१ (परदेशी ६)
कायम केलेले खेळाडू – आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण.
५. पंजाब किंग्स –
उर्वरित किंमत – ७२ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २३ (परदेशी ८)
कायम केलेले खेळाडू – मयंक अगरवाल, अर्शदीप सिंग
६. राजस्थान रॉयल्स –
उर्वरित किंमत – ६२ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २२ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल
७. सनरायझर्स हैदराबाद –
उर्वरित किंमत – ६८ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २२ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – केन विलियम्सन, अब्दुल सामद, उम्रान मलिक
८. अहमदाबाद संघ –
उर्वरित किंमत – ५२ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २२ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – हार्दिक पंड्या, राशिद खान, शुबमन गिल
९. लखनऊ सुपरजायंट्स –
उर्वरित किंमत – ५९ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २२ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई
१०. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
उर्वरित किंमत – ५७ कोटी
संघात खेळाडूंची उर्वरित जागा – २२ (परदेशी ७)
कायम केलेले खेळाडू – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
“इतकी उत्सुकता वाढवायची काय गरज” लखनऊ संघाच्या लोगोचे अनावरण होताच चाहत्यांनी केले ट्रोल
मला जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा टेनिसपटूंमध्ये यायचे आहे – कारात्सेव
चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्री धडाकेबाज सुरुवात






