---Advertisement---

आरसीबीचा १०.७५ कोटींच्या हुकमी एक्काचा ‘या’ गोष्टीमुळे वाढलाय आत्मविश्वास, आयपीएल २०२२मध्ये दाखवणार जलवा

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 1:30 AM
Harshal-Patel
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चं बिगुल २६ मार्च रोजी वाजणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्याची मतं मांडली आहेत. ३१ वर्षीय पटेल या हंगामासाठी बेंगलोर संघाचा आघाडीचा गोलंदाज असेल. बेंगलोर संघाने आयपीएल २०२२च्या लिलावापूर्वी त्याला संघात रिटेन केले नव्हते. मात्र, लिलावात त्याला १०.७५ कोटी रुपयांची मोठी बोली लावत पुन्हा आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्याच्यावर एवढी मोठी बोली लागली असली, तरीही त्याला याचा त्याच्यावर कोणताही दबाव नाहीये.

बेंगलोर संघाने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओत पटेल (Harshal Patel) म्हणाला की, “मला ज्याप्रकारे जबाबदाऱ्या दिल्या जातात, त्यामुळे दबाव तर जास्त असतोच. तसेच, मला नेहमी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करायचा असतो. मी याकडे दबाव म्हणून पाहत नाही. याउलट मी ही याकडे संधी म्हणून पाहतो.”

https://www.youtube.com/watch?v=1e2JNZpEkL8

आयपीएल २०२१मधील पटेलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १५ सामने खेळताना ८.१४ च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने यासह एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. या कामगिरीनंतर त्याला भारताच्या टी२० संघातही स्थान मिळाले होते. पटेल याबद्दल बोलताना म्हणाला की, “कदाचित यावर्षी माझा आत्मविश्वास अधिक असेल. मागील वर्ष माझ्यासाठी रेकॉर्ड ब्रेकिंग होते. तसेच, यानंतर मी भारतीय संघासाठी जे केले आहे, त्याचे फळही मला मिळेल. यामुळे माझा आत्मविश्वास खूप जास्त वाढला आहे आणि मी याच वाढलेल्या आत्मविश्वासासोबत आयपीएलमध्ये उतरणार आहे.”

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी पटेल उत्सुक
हर्षल पटेलने नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली आहे. पटेलला विश्वास आहे की, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डू प्लेसिस हा बेंगलोर संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगला व्यक्ती आहे.

तो म्हणाला की, “मी त्याच्याशी यापूर्वी कधीही संवाद साधला नव्हता, पण तो ज्या प्रकारे क्रिकेट खेळतो, त्याबद्दल मी त्याचा आदर करतो. तो आमचा आदर्श आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. आयपीएल हंगामापूर्वी आम्ही याबद्दल बोलत होतो आणि त्याने सर्वकाही बरोबर सांगितले होते. तो आमचा कर्णधार होईल, याचा मला आनंद आहे.”

आयपीएल २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पहिला सामना २७ मार्चला मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘धोनी, रायुडू आणि उथप्पाने किती क्रिकेट खेळले, हाच प्रश्न आहे’, आगामी आयपीएलपूर्वी दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया

‘असं असतं भावा’, रिषभ पंतने ‘खाबी’ बनत उडवली अक्षर पटेलची खिल्ली, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

एकटी मुंबई इंडियन्स होम ग्राउंडवर खेळणार आयपीएल सामने, पण याचा त्यांना फायदा होणार? वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---