पुणे। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५७ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पार पडला. महाराष्ट्र क्रिकट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे झालेल्या या सामन्यात गुजरातने ६२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने २० षटकात ४ बाद १४४ धावा करत लखनऊ समोर १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघ १३.५ षटकात ८२ धावांवरच सर्वबाद झाला. पण, गुजरातने या विजयासह अधिकृतपणे प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले.
गुजरात प्लेऑफमध्ये
हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने (Gujarat Titans) आत्तापर्यंत १२ सामन्यांमध्ये ९ सामने जिंकले असून केवळ ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे गुजरातने गुणतालिकेत १८ गुण झाले आहेत. त्याचमुळे गुजरातने गुणतालिकेत (Points Table) पहिल्या चार संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
कसे आहे प्लेऑफचे समीकरण
गुजरातव्यतिरिक्त आयपीएल २०२२ (IPL 2022) गुणतालिकेत सध्या १८ गुण पूर्ण करण्याची संधी केवळ ३ संघांना आहे. अन्य संघ जास्तीत जास्त १४ ते १६ गुण मिळवू शकतात. १८ गुण मिळवू शकणाऱ्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा समावेश आहे. यातील लखनऊला उर्वरित २ साखळी सामन्यातून एक जरी जिंकला तरी १८ गुण पूर्ण करत प्लेऑफमधील स्थान पक्के करता येऊ शकते. तर बेंगलोर आणि राजस्थान या संघांचे प्रत्येकी ७ विजयांसह सध्या १४ गुण आहेत.
बेंगलोरचे अजून २ साखळी सामने बाकी आहेत आणि राजस्थानचे अजून ३ सामने बाकी आहेत. त्यामुळे या तिन्ही संघांना उर्वरित सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये (IPL Playoffs ) स्थान मिळवण्याची थेट संधी आहे.
मात्र, अन्य ६ संघांपैकी ५ संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. मुंबई इंडियन्स एकमेव संघ आहे, जो अधिकृतपणे प्लेऑफमधून बाहेर गेला आहे. पण दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या चारही संघांचे सध्या १० गुण आहेत. त्यामुळे आता या चारही संघांना त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवावाच लागणार आहे. त्याचबरोबर अन्य संघांच्या निकालावर आणि नेटरनरेटवर प्लेऑफसाठी अवलंबून राहावे लागणार आहे.
त्याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स संघासाठी प्लेऑफचा मार्ग सर्वात खडतर आहे. त्यांचे अधिकृतपणे आव्हान संपले नसले तरी, त्यांचे सध्या ११ सामन्यांत ४ विजय आणि ७ पराभवासह ८ गुण आहेत. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील, त्याचबरोबर बाकी संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
यंदाची आयपीएल ट्रॉफी गुजरात टायटन्सच घेऊन जाणार; विश्वास बसत नसेल, तर ही आकडेवारी पाहाच
लखनऊला ६२ धावांनी नमवत गुजरात पुन्हा ‘टेबल टॉपर’, बनला प्लेऑफमध्ये पोहोचणारा IPL 2022मधील पहिला संघ
कोण आहे शुबमन गिलची सर्वात मोठी प्रेरणा? म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर…’