सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२मधील १२वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना लखनऊने १२ धावांनी जिंकला. या विजयामुळे लखनऊ संघ गुणतालिकेत ५व्या क्रमांकावर आला आहे. दुसरीकडे हैदराबाद संघ शेवटच्या क्रमांकावर आहे.
या सामन्यात लखनऊ (Lucknow Super Giants) संघाकडून केएल राहुलने (KL Rahul) ६८ आणि दीपक हुड्डाने (Deepak Hood) ५१ धावांची अफलातून खेळी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर लखनऊने २० षटकात ७ विकेट्स गमावत १६९ धावा करत हैदराबादला १७० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने ४४ आणि निकोलस पूरनने ३४ धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे राजस्थान संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत फक्त १५७ धावाच करू शकला. अशाप्रकारे लखनऊने १२ धावांनी सामना खिशात घातला.
या विजयासह लखनऊ संघाला मोठा फायदा झाला आहे. तसेच, याचा दिल्ली कॅपिटल्स संघाला फटका बसला आहे. लखनऊ संघ गुणतालिकेत ५व्या क्रमांकावर आला आहे, तर दिल्ली संघ ६व्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच, हैदराबाद संघ गुणतालिकेत १०व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गुणतालिकेत टॉप-४ संघांमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स संघांचा समावेश आहे.
लखनऊ संघासोबतच केएल राहुल आणि दीपक हुड्डालाही चांगला फायदा झाला आहे. या सामन्यात राहुल आणि हुड्डाने केलेल्या कामगिरीमुळे ते आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये सामील झाले आहेत. हुड्डा ११९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर १०८ धावांसह केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत इशान किशन आणि जोस बटलर संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या दोघांच्याही १३५ धावा आहेत. दुसरीकडे पर्पल कॅप कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवकडे आहे.
#१२व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज)–
१. इशान किशन- १३५ धावा, २ सामने (मुंबई इंडियन्स)
२. जोस बटलर- १३५ धावा, २ सामने (राजस्थान रॉयल्स)
३. दीपक हुड्डा- ११९ धावा, ३ सामने (लखनऊ सुपर जायंट्स)
४. शिवम दुबे- १०९ धावा, ३ सामने (चेन्नई सुपर किंग्स)
५. केएल राहुल- १०८ धावा, १३ सामने (लखनऊ सुपर जायंट्स)
#१२व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज)–
१. उमेश यादव- ८ विकेट्स, ३ सामने (कोलकाता नाईट रायडर्स)
२. आवेश खान- ७ विकेट्स, ३ सामने (लखनऊ सुपर जायंट्स)
३. राहुल चाहर- ६ विकेट्स, ३ सामने (पंजाब किंग्स)
४. युजवेंद्र चहल – ५विकेट्स, २ सामने (राजस्थान रॉयल्स)
५. मोहम्मद शमी – ५ विकेट्स, २ सामने (गुजरात टायटन्स)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई संघ एक जरी सामना हारला, तर होईल खेळ खल्लास; माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
IPL2022| बेंगलोर वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही