आयपीएल लिलाव (IPL mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार असुन सर्व फ्रॅंचायझी लिलावाची तयारी करत आहेत. संघांनी आपली रणनीती तयार केली आहे. यामध्ये राजस्थान राॅयल्स (rajsthan royals) संघाचाही सामावेश आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्ठान राॅयल्स संघाने २००८ मध्ये आयपीएल सुरु झाल्याच्या पहिल्याच वर्षी जेतेपद पटकावले होते. यानंतर एकाही हंगामात राजस्थान संघ यशस्वाी झाला नाही, याच कारणामुळे संघ पुन्हा चॅम्पियन बनू शकला नाही. राजस्थान राॅयल्स संघ यावर्षी जेतेपदावरील आपला दावा मजबुत करण्यासाठी लिलावात उतरणार आहे.
संघाचा कर्णधार संजू सॅमसनचे (sanju samson)असे म्हणणे आहे की, आयपीएल २०२२ साठीचा मेगा लिलाव त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण त्यांना पुढील पाच वर्षांसाठी योग्य खेळाडूंची निवड करून भक्कम पाया तयार करायचा आहे. गेल्या काही हंगामात संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. नियमितपणे कामगिरी न करणे ही त्यांच्यासाठी मोठी समस्या बनली आहे. लिलावात योग्य खेळाडूंची निवड झाल्याने त्याला ही अडचण संपवायला आवडेल.
आयपीएलच्या पहिल्या मोसमात चॅम्पियन झालेला राजस्थान राॅयल्स संघ १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या आसपीएल लिलावात ६२ कोटी रुपयांसह उतरणार आहे. राजस्थान राॅयल्स संघाने संजू सॅमसन, जाॅस बटलर आणि यशस्वी जायसवाल या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. सॅमसनला १४ कोटी, बटलरला १० कोटी तर यशस्वी जायसवालला ४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. राजस्थानच्या बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, क्रिस मॉरिस आणि डेविड मिलर या खेळाडूंना मेगा लिलावापुर्वी संघातून वगळण्यात आले आहे.
मागच्या आयपीएलमध्ये राजस्थान संघाने खास कामगिरी केली नाही. त्यांनी १४ सामन्यांपैकी ५ सामने जिंकत सातवा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे या लिलावात संघ नव्या खेळाडूंना संघात घेईल. यावर संघाचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, “आम्ही लिलावात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही अश्या खेळाडूंना संघात घेवू इच्छितो जे फ्रॅंचायझींची दृष्टीकोण समजू शकतील आणि आमच्या संघाला पुन्हा मोठ्या उंचीवर घेवून जावू शकेल.”
आतापर्यंतच्या लिलावात राजस्थानचा संघ मोठा स्टार नसलेल्या खेळाडूंवर बोली लावत होता. फ्रँचायझीचे क्रिकेट निर्देशक कुमार संगकारा म्हणाले, “आम्ही विस्तृत स्वरुपात विश्लेषणात्मक मूल्यांकन केले आहे. आम्ही खेळाडूंवर गोळा केलेली माहिती आमच्या डेटाबेसमध्ये आहे. आम्ही एका मजबूत विश्लेषणात्मक प्रक्रियेसह आमचा डेटा आणखीन सुधारत आहोत. खरं तर ही एक अतिशय व्यापक प्रक्रिया आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
यांचा विषयच खोल! भारतीय संघाकडून खेळत नसले, तरीही कोटीत पैसा कमावतात ‘हे’ शिलेदार
‘मराठमोळा’ ऋतुराज पुनरागमनासाठी सज्ज, कोरोनावर केली मात; पण तिसऱ्या वनडेत मिळणार का संधी?
दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाकडून मेगा लिलावाच्या प्लॅनचा खुलासा, ७ खेळाडूंना करणार टार्गेट